22 January 2021

News Flash

मी काही लेचापेचा नाही, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना टोला

धनंजय मुंडे यांच्या टीकेला सुरेश धस यांचं उत्तर

मी काही गार्‍हाणं मांडण्याइतपत लेचापेचा आणि आंडूपांडू नाही. अशी भूमिका भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मांडत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर यांच्यावर निशाणा साधला. उसतोड मजुराच्या प्रश्नावर बैठकीसाठी बोलविले नव्हते. त्यावरुन धनंजय मुंडे यांच्यावर बैठकीपूर्वी धस यांनी निशाणा साधला होता. त्यावर बैठकीत काही चर्चा झाली का? त्या प्रश्नावर सुरेश धस यांनी भूमिका मांडली.

पुण्यात उसतोड मजुराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादाशुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीतून बाहेर पडताच, सुरेश धस यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.

यावेळी सुरेश धस म्हणाले की, उसतोड मजुराच्या प्रश्नावर आज पुण्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तसेच शरद पवार साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांनी आजवर झालेल्या बैठकीत बोलवले आहे. समस्या समजून घेतले असून कधीही अन्याय केला नाही. मात्र आज बैठकी पूर्वी बोलवले नसल्याने मला आंदोलन करावे लागले. त्यानंतर अखेर बैठकीला बोलविण्यात आले. त्यामध्ये उस तोड मजुराच्या समस्या मांडल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाल्यास, उसतोड कामगारांच्या वेतनात ८५ टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे.

यासह अनेक मुद्दे मांडले आहेत. या बैठकीत चांगली चर्चा झाली असून शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी आमचा संप दोन महिन्यांसाठी मागे घेत आहोत. जर दोन महिन्यांनंतर निर्णय झाला नाही. तर आम्ही उसाच्या फडात जाऊन आंदोलन करू, इशारा देखील त्यांनी दिला. धनंजय मुंडे यांच्यामुळे बैठकीत येऊ दिले नसल्याचा अप्रत्यक्षपणे भूमिका धस यांनी मांडली होती. त्या बाबत चर्चा बैठकीत झाली का त्यावर ते म्हणाले की, मी काही गार्‍हाणं मांडण्या इतपत लेचापेचा नसल्याची भूमिका मांडत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 4:49 pm

Web Title: i am not weak suresh dhass reply to dhananjay munde scj 81 svk 88
Next Stories
1 आंदोलनानंतर भाजपा नेते सुरेश धस यांना शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मिळाला प्रवेश
2 पुण्यात इंजिनिअर पत्नीने रचलं पतीला नपुंसक बनवण्याचं कारस्थान कारण…
3 नदी शुद्धीकरण प्रकल्पात पुन्हा अटींचा भंग
Just Now!
X