पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या सांगवी मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी पाहात असताना कोयत्याने तिघांवर वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्त्यातून खून करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

या घटनेप्रकरणी रिद्धेश उर्फ लाला हेमंत पाटील आणि शुभम बाबुराव नावळे या दोघांना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटने प्रकरणी गालीब करीम शेख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

How Files Help police to Solved Murder Mystery
Flies Helped Police : पोलिसांनी उडत्या माश्यांच्या मदतीने कसा लावला १९ वर्षीय आरोपीने केलेल्या हत्येचा छडा?
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Police seized 70 lakh rupess in suspicious car traveling from mp to Maharashtra
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
thane Bhiwandi attempt to murder
ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न
Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य

आणखी वाचा- पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तयारी वेळी ही घटना घडलेली आहे. फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ आकीब शेख, सिद्धांत धेंडे आणि गौरव भरत यलमार हे गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी बघण्यासाठी रस्त्यावर थांबले होते. तेव्हा, आरोपी सिद्धेश आणि शुभम यांच्यासह इतर काही जणांनी फिर्यादी गालिब यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वादात आकीब, सिद्धार्थ आणि गौरव हे पडल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात तिघे ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकीबच्या पाठीवर आणि कपाळावर वार करण्यात आले आहेत. सिद्धांतच्या गालावर आणि गौरव च्या पाठीत वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर सांगवी परिसरात एकच खळबळ उडाली होती. अवघ्या काही तासात आरोपींना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत.