कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक झाली. १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपकडून हेमंत रासने,तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर हे उमेदवार आहेत.ही पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यंत अनेक घटनांनी चर्चेत राहिली आहे.

“लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरांना दिलं”, रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान; गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल कसबा विधानसभा पोट निवडणुकीमध्ये ५०.०६इतक टक्के मतदान झाले असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने की महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर बाजी मारणार याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
मात्र त्याच दरम्यान पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र धंगेकर यांच अभिनंदन असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे.हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून या फ्लेक्सची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहण्यास मिळत आहे.