पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान २९ मार्चला ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मेगाब्लॉकमुळे २६ मार्चला पुणे -मिरज एक्स्प्रेस आणि मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. याचबरोबर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस २६ व २९ मार्चला सकाळी ८.१५ वाजता सुटण्याऐवजी सकाळी ९.४५ वाजता सुटेल. कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस येथून २६ मार्चला सकाळी ९.१० वाजण्याऐवजी सकाळी १०.४५ वाजता सुटेल. तसेच, कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-पुणे डेमू २७ ते २९ मार्चदरम्यान पहाटे ५ वाजण्याऐवजी ७ वाजता सुटेल.

हेही वाचा…शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची खेळी! उद्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर दादर-सातारा एक्स्प्रेस २५ मार्चला एका तास विलंबाने धावणार आहे. लोहमार्गांचे दुहेरीकरण आणि देखभाल व दुरूस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे गाडी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.