Mumbai Marathi News: लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर एक लाखावर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशीच बुधवारी (३० एप्रिल २०२५ रोजी) सोन्याच्या दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण – कर्जत विभागातील भिवपुरी रोड – कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत फक्त रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Live Updates

 Pune Mumbai Nagpur Breaking News Live Today, 30 April 2025 मुंबई, पुणे, नागपूर न्यूज लाईव्ह अपडेट्स

22:55 (IST) 30 Apr 2025

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक आता क्यूआर कोडद्वारे समजणार

मध्य रेल्वे, मुंबई विभागाने प्रवाशांना आवश्यक प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोड-आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
22:42 (IST) 30 Apr 2025

वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलम आग २२ तासांनी विझली; आग विझवण्यासाठी ५३ अग्नीशमन वाहने, ७६ अधिकारी, २७३ जवान

बुधवारी २ फायर इंजिन, २ जंबो टँकर आदींसह मुंबई अग्निमशन दलाची यंत्रणा कार्यरत होती व मॉलवर पाणी मारून तापमान कमी करण्याचे काम केले जात होते. ...सविस्तर वाचा
22:22 (IST) 30 Apr 2025

मृत पोलिसाच्या पत्नीची ५० लाखांची फसवणूक

चारकोप पोलिसांनी बोरिवली येथील रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ...वाचा सविस्तर
22:16 (IST) 30 Apr 2025

‘बुक माय होम…’,घरे विकण्यासाठी म्हाडा कोकण मंडळाची नवीन शक्कल; सोडत न काढता, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

‘बुक माय होम’ नावाने https://bookmyhome.mhada.gov.in/ असे नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले असून हे संकेतस्थळ बुधवारपासून कार्यान्वित झाले आहे. ...अधिक वाचा
22:03 (IST) 30 Apr 2025

दिशा सालियन मृत्यू प्रकरण : दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दिशा हिने आत्महत्या केल्याचा किंवा तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवले व प्रकरण घाईघाईने बंद केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. ...अधिक वाचा
21:43 (IST) 30 Apr 2025

बदलापूर चकमक प्रकरण, गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करण्याची सरकारची भूमिका दुर्दैवी, मुंबई उच्च न्यायालयाची टीका

आधी गुन्हा दाखल करण्यातील अडचणींचा पाढा वाचणाऱ्या सरकारला अखेर शनिवारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची हमी न्यायालयात द्यावी लागली. ...वाचा सविस्तर
21:31 (IST) 30 Apr 2025

२४ हजार विद्यार्थ्यांची पुन्हा सीईटी परीक्षा, एमएचटी सीईटीच्या परीक्षेत चुकीचे पर्याय आलेल्या विद्यार्थ्यांची पुढील आठवड्यात परीक्षा

परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मेसेज, ई-मेल, व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून कळविण्यात येणार असल्याचेही सीईटी कक्षाचे आयुक्त सरदेसाई यांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
21:06 (IST) 30 Apr 2025

लव्ह जिहाद? अकोल्यात भिन्न धर्मीय तरुण-तरुणी एका बंद सदनिकेत आढळले; तक्रारीनंतर तरुण…

बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. ...वाचा सविस्तर
20:54 (IST) 30 Apr 2025

जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय ऐतिहासिक असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला शिवसेेनेचे पुर्ण समर्थन असेल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ...वाचा सविस्तर
20:42 (IST) 30 Apr 2025

पाच तासानंतर वाहन चालकांनी घेतला कोंडीतून मोकळा श्वास, शिळफाटा मार्गावरील अपघातामुळे झाली होती कोंडी

अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालाकांना २५ ते ३० मिनीटे लागत होते. सुमारे पाच तासानंतर म्हणजेच, दुपारी १ नंतर येथील वाहतुक सुरळीत झाली. ...वाचा सविस्तर
20:28 (IST) 30 Apr 2025

विक्रोळी स्थानकावरील उड्डाणपूल लवकरच सुरू, समस्या सुटणार की वाढणार?

टागोर नगर, कन्नमवार नगर, एलबीएस मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग येथे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. ...अधिक वाचा
20:15 (IST) 30 Apr 2025

अतर्क्य! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा कट

या प्रकरणी ममता राठी (२७) रा. येरला, मोर्शी, चेतन टांक (१९), करण मुंदाने (१९) दोघेही रा. आर्वी, वर्धा व स्मित बोबडे (१९) रा. मांगीलाल प्लॉट, अमरावती यांना अटक करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
19:23 (IST) 30 Apr 2025

आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूची चर्चा फक्त निवडणूकीपूरती, केदार दिघे यांचा गंभीर आरोप

केवळ स्वार्थासाठी राजकारण करता असा आरोप आनंद दिघे यांचे पुतणे तसेच ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावर केला. ...वाचा सविस्तर
18:53 (IST) 30 Apr 2025

भारतात यापूर्वी जातनिहाय गणना केव्हा झाली होती?

जातींची गणना करणारी १९३१ ची जनगणना वसाहतवादी ब्रिटिश सरकारने केली होती आणि १९०१ च्या जनगणनेनंतर अशी ही पहिलीच जनगणना होती. ...सविस्तर वाचा
18:19 (IST) 30 Apr 2025

चंद्रपूर : इरई पाठोपाठ झरपट नदीचे अस्तित्व धोक्यात; अतिक्रमणसह, नदी पात्रातूनच रस्ता…

नदीच्या पात्रात जे अतिरिक्त भरण टाकले आहे त्यावरून यापुढे पाणी इतरत्र दुसऱ्या वस्त्यांमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...सविस्तर वाचा
18:08 (IST) 30 Apr 2025

महागड्या ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटचा प्रश्न जूनपर्यंत मार्गी लागणार नाही, न्यायालयात….

सुदर्शन बागडे यांनी महागड्या नंबर प्लेटबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. ...अधिक वाचा
18:03 (IST) 30 Apr 2025

गडचिरोली : धान बोनस घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या अडचणीत वाढ

गेल्या काही वर्षांपासून धान खरेदी, भरडाई घोटाळा, तांदूळ तस्करी यासारख्या प्रकारामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. अशातच आता धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये देखील कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. ...अधिक वाचा
17:58 (IST) 30 Apr 2025

बुलढाणा जिल्ह्यातील तिघांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

महाराष्ट्र पोलीस दलात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक बहाल केले जाते. ...वाचा सविस्तर
17:54 (IST) 30 Apr 2025

सुरक्षा रक्षकांना आता 'खाकी वर्दी', शासनाची मान्यता; महाराष्ट्रात १ मेपासून…

राज्यभरात जिल्हानिहाय १६ सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता १ मेपासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे. ...वाचा सविस्तर
17:45 (IST) 30 Apr 2025

पुण्यात पकडलेल्या बनावट नोटांचा पुरवठा परराज्यातून ? पोलिसांकडून तपास सुरू

पुणे शहर परिसरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह पाचजणांना अटक करण्यात आली. ...सविस्तर बातमी
17:44 (IST) 30 Apr 2025

टॅक्सीचालकाला मारहाण करून लूटले

मुंबई: प्रवासी बनवून ओला टॅक्सीत बसलेल्या तिघांनी चालकाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील ११ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी पहाटे विक्रोळी परिसरात घडली. याप्रकरणी टॅक्सीचालकाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

ॲप आधारित कंपनीसाठी टॅक्सी चालविणारा मिराज आलम (२३) नेहमीप्रमाणे रविवारी मध्यरात्री टॅक्सी चालवित होता. त्यावेळी त्याच्या मोबाइलवर साकीनाका परिसरात जाण्यासाठी एक भाडे आले. त्यानुसार तो प्रवासी असलेल्या विक्रोळीतील पालिका वसाहत परिसरात गेला. तेथे तीन जण त्याच्या टॅक्सीत बसले. ते रात्रभर टॅक्सीतून संपूर्ण रात्रभर साकीनाका, अंधेरी, मिरारोड आणि पवई परिसरात फिरत होते. त्यानंतर एका निर्जनस्थळी त्यांनी टॅक्सी थांबवली आणि आलमला बेदम मारहाण केली. आलम जवळील रोख ११ हजार रुपये काढून घेतले आणि आणि त्यांनी पोबारा केला.

घाबरलेल्या टॅक्सीचालकाने दुसऱ्या दिवशी ही बाब त्याच्या मित्राला सांगितली. मित्राने तत्काळ त्याला पार्कसाईट पोलीस ठाण्यात नेले. त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

17:42 (IST) 30 Apr 2025

आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ, उन्हाळ्यात प्रवाशांना…

०१२११ बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड आणि ०१०९१ खंडवा जंक्शन ते सनावद अनारक्षित गाडी या विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढविण्यात आला. ...वाचा सविस्तर
17:28 (IST) 30 Apr 2025

घड्याळी तासिका शिक्षकांच्‍या मानधनात अखेर वाढ! १२० रुपयांवरून…

माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार २५० रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना ३०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
17:17 (IST) 30 Apr 2025

नापास झाल्यामुळे पोलिसाच्या मुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

कामठी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ...वाचा सविस्तर
16:50 (IST) 30 Apr 2025

विद्यार्थ्यांना अमेरिकी व्हिसाबाबत मार्गदर्शन; मुंबईतील अमेरिकी वाणिज्य दूतावासातर्फे ८ मेला मार्गदर्शन

विविध अभ्यासक्रमांचे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आणि विशिष्ट अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. ...सविस्तर बातमी
16:42 (IST) 30 Apr 2025

गोदाम फोडून तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड

आरोपी जैन आणि शेख यांच्याकडून सहा लाख ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि १८ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला. ...सविस्तर वाचा
16:20 (IST) 30 Apr 2025

कल्याण डोंबिवलीत विकास आराखडा डावलून सिमेंट रस्त्यांची कामे, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची आयुक्तांकडे चौकशीची मागणी

शहरातील रस्ते हे विकास आराखड्यातील १५ मीटर, १८ मीटर, २० मीटर रस्त्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. कल्याण, डोंबिवली शहरे वाढत आहेत. ...सविस्तर वाचा
15:45 (IST) 30 Apr 2025

विकासाच्या नावावर दीड हजार वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव, न्यायालयाने थांबविले….

वृक्षतोड शहरात होत असेल तर वृक्षारोपण शहरातच व्हायला हवे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले. विभागीय क्रीडा संकुलासह इतर ठिकाणी प्रस्तावित वृक्षतोडीवर न्यायालयाने अंतरिम स्थगिती देत ही वृक्षतोड थांबविली आहे. ...सविस्तर वाचा
15:32 (IST) 30 Apr 2025

पुरुषांमध्ये कर्करोग वाढतोय… उपचारासाठी ‘मेनकॅन’… टाटा रुग्णालयाचा नवा उपक्रम

भारतामध्ये मागील काही वर्षांपासून पुरुषांमधील पौरुषग्रंथी कर्करोग, लिंग कर्करोग आणि अंडकोष कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ...सविस्तर वाचा
15:15 (IST) 30 Apr 2025

मुंबईतील १२ हजार घरांची एप्रिलमध्ये विक्री, रेडीरेकनरच्या दरवाढीनंतरही घरविक्री समाधानकारक

मुंबईमधील १५ हजारांहून अधिक घरे मार्चमध्ये विकली गेली होती आणि यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. ...अधिक वाचा

Mumbai Pune Nagpur News Live Updates in Marathi

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट| मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट