05 December 2020

News Flash

शिळफाटय़ाच्या वाहतूक कोंडीवर उतारा

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ वाहतूक सेवक 

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ वाहतूक सेवक 

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोनाकाळात कल्याण-शीळ मार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाने येथील वाहतूक नियोजनासाठी १०५ वाहतूक सेवकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी हे कर्मचारी ठाणे वाहतूक पोलिसांना मदत करतील.

ठाणेपल्ल्याड राहणारे हजारो प्रवासी दररोज त्यांची मुंबईतील कार्यालये रस्ते मार्गाने गाठत आहेत. याचा सर्वाधिक भार हा कल्याण-शिळ फोटा मार्गावर पडू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर रस्ते विकास महामंडळाने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. खड्डय़ांमुळे या मार्गाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना तीन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. रस्त्यांची कामे आणि खड्डे यांमुळे कल्याण-शीळ मार्गावर दररोज वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत.

ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांच्या कल्याण विभागावर मोठा भार येत आहे. या विभागात केवळ १२३ अधिकारी, कर्मचारी आणि ४० वाहतूक सेवक कार्यरत आहेत. त्यातही कल्याण-डोंबिवली शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी याच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असते. कल्याण शिळ फाटा मार्ग आणि अंतर्गत मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ आलेले आहे. त्यामुळे सुमारे महिन्याभरापूर्वी या संदर्भात वाहतूक पोलिसांनी एमएसआरडीसीला कल्याण-शिळ फाटा मार्गावर वाहतूक सेवक उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर आता एमएसआरडीसीने हिरवा कंदील दिला आहे. १०५ वाहतूक सेवकांसाठी पाच दिवसांपूर्वी निविदाही काढली आहे. त्यामुळे येत्या काळात १०५ वाहतूक सेवकांचे बळ मिळाल्यास वाहतूक कोंडी सोडविण्याची मोठी मदत पोलिसांना मिळणार आहे.

सध्या काय होत आहे?

शिळ फाटा येथे रस्ता रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसीने घेतले आहे. त्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी आहे. त्यातच अनेक वाहनचालक हे विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जात असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी वाढ होत असते. पोलीस अपुरे पडत असल्याने विरुद्ध दिशेकडून येणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसते. वाहतूक सेवक उपलब्ध झाल्यास नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करणे शक्य होणार आहे.

पोलिसांनी एमएसआरडीसीकडे काही दिवसांपूर्वी वाहतूक सेवक मिळावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार आता लवकरच वाहतूक सेवक मिळणार आहेत. वाहतूक सेवकांमुळे शिळ फाटय़ाची वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत मिळू शकेल.

अमित काळे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 2:33 am

Web Title: msrdc take steps to solve traffic problems on kalyan shilphata road zws 70
Next Stories
1 बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा बांधकामे
2 स्थायी समितीवरून भाजपमध्ये बंडखोरी
3 करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पालिकेचा त्रास
Just Now!
X