ठाणे : प्रभू श्री रामांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर येत्या २४ तासांत गुन्हा दाखल केला नाही तर वर्तकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलीस ठाण्यातच महाआरती करु, असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. प्रभू श्री राम हे मांसाहारी होते, असे अकलेचे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडलेत पण, ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही. असे असताना सातत्याने जितेंद्र आव्हाड हे हिंदू देवदेवतांविरुद्ध, सनातन धर्माविरुद्ध, हिंदू धर्माविरुद्ध बोलतात आणि धर्माचा अपमान करतात तर दुसरीकडे बहुजन विरु वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभू श्री रामाची महाआरती केली म्हणून गोमूत्र शिंपडतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : कल्याण डोंबिवलीत १.६५ लाख बेकायदा बांधकामे, उच्च न्यायालयाचा संताप

ॠषी वाल्मिकी यांनी जे रामायण लिहिले आहे ज्यात २४ हजार श्लोक लिहिले आहेत. ७ खंडामध्ये रामायण हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्याच्यामध्ये बालखंड आहे, अयोध्या खंड आहे, अरण्य खंड आहे, किष्किन्धा खंड आहे, सुंदर काण्ड आहे, युद्ध कांड आहे आणि शेवटच उत्तर खंड आहे. या सातही खंडांमध्ये २४ हजार श्लोक लिहिले आहेत. त्याच्यात कुठेही प्रभू श्री रामाने मांसाहार केला होता हे कुठेही आढळून येत नाही. वनवासात असताना देखील फळे, कंदमुळे खावून प्रभू श्री रामांनी वास्तव्य केले. अशी स्थिती असताना, कायम हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलायचे ही जितेंद्र आव्हाड यांची संस्कृती आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा : ठाण्यातील झाडांची माहिती मिळणार क्यू आर कोडद्वारे, २१ उद्यानांतील दोन हजार झाडांवर लावले क्यू आर कोड

विरु वाघमारे व त्याचे सहकारी हे कुठलेही आंदोलन करण्यासाठी नव्हे तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्री रामावरील वक्तव्याचा शांततापूर्णरित्या निषेध करण्यासाठी तिथे गेले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये प्रभू श्री रामाचा फोटो होता आणि ते तिथे महाआरती करणार होते. पण दुर्देवाने मला पोलिसांचा देखील निषेध करावसा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखले आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane anand paranjape demand police case against jitendra awhad for statement on shri ram css
First published on: 04-01-2024 at 11:48 IST