लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा रोड येथील रखडलेल्या कर्करोग रुग्णालयाच्या कामास निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने तात्काळ त्याबाबतचे आरक्षण फेरबदल करून शासनाकडे सादर करावे, असे निर्देश हिवाळी अधिवेशन महापालिकेला देण्यात आले आहे. मागील सहा महिन्यापासून भूमिपूजनानंतर रुग्णालयाचे काम सुरु झाले नसल्याची लक्षवेधी विरोधकांकडून अधिवेशनात सादर करण्यात आली होती.

बोरीवली ते विरार पर्यंत  एकही कर्करोग रुग्णालय नाही आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहरात कर्करोग उभारण्याची संकल्पना आमदार गीता जैन यांनी मांडली होती. त्यानुसार महापालिकेने आरक्षण क्रमांक २१० आणि आरक्षण क्रमांक २११ ही जागा निश्चित करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. या दोन्ही जागा हे वाचनालय व महिला प्रस्तुतीगृहासाठी आरक्षित होती. यास शासनाने देखील हिरवा कंदील देत प्रथम टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता आणि २२ एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

आणखी वाचा-डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर अंधारात; पहाटेच्या वेळेत रेल्वे स्थानक भागात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय

मात्र भूमिपूजनानंतर देखील या रुग्णालयाचे काम सुरु झाले नसल्याची बाब लोकसत्ता वृत्तपत्राने सर्व प्रथम १३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी जवळपास १३४ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. मात्र हा निधी उपलब्ध न झाल्यामुळे तो शासनाने द्यावा, असे महापालिकेने शासनाच्या वैदिकीय आरोग्य विभागाला सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रुग्णालयाचे बांधकाम हे निधी अभावी रखडणे हे योग्य नसून शासनाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी लक्षवेधी सुचना बाळासाहेब थोरात, नानाभाऊ पटोले, वर्षा गायकवाड, राजेश एकडे, संजय जगताप शिरीष चौधरी आणि प्रतिभा धानोरकर यांनी आता नागपूर येथे सुरु असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर केली होती. यावर महापालिकेने अधिवेशनकाळातच तात्काळ आरक्षणात फेरबदल करून कर्करोग रुग्णालयाचे स्वतंत्र आरक्षण प्रस्तावित करत असल्याचा प्रस्ताव सादर करावा, आणि त्यानंतर निधी उपलब्ध केला जाईल, असे निर्देश अधिवेशनाकडून देण्यात आले असल्याची माहिती खात्री दायक सूत्रांकडून देण्यात आली आहे.