गेल्या आठवड्यात रस्ते विषयांवरुन मनसे-शिवसेनेचे ट्वीटर युध्द झाले असताना, आता पुन्हा शिंदे गटातील घराणेशाही विषयांवरुन पुन्हा शिवसेना शिंदे समर्थक आणि मनसेचे आ. प्रमोद पाटील यांच्यात ट्वीटर युध्द रंगले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यात घराणेशाही सुरू झाली आहे अशी टीका मनसेचे आ. प्रमोद पाटील यांनी करताच त्याला डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मनसेही काटई गाव प्रायव्हेट लिमीटेड कंपनी आहे. मनसेने आता आमदारकीचे स्वप्न पाहण्याऐवजी खासदारकीचे स्वप्न पाहावे, अशी टीका केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवलीच्या होत असलेल्या बदनामीला वैतागले आमदार राजू पाटील, म्हणाले बाहेरच्यांनी लुडबुड…

केंद्रात राज्यसभा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तांतर होत असताना मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील यांनी भाजप, शिंदे यांना कोणत्याही अटीशर्तीविना पूर्ण ताकदीने साहाय्य केले. त्यामुळे सुरुवातीला मनसेचे एकमेव आमदार पाटील यांना राज्यात मंत्रीपद देण्याच्या जोरदार हालचाली सुरुवातीला सुरू होत्या. तसे संकेत देण्यात येत होते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेचा उडालेला धुरळा बसू लागताच हळूहळू काही उमद्या कानभरे आणि पाचरमारे यांनी बजावलेल्या भूमिकेमुळे आ. प्रमोद पाटील यांना मंत्रीपद किंवा मिळणारे महत्वाचे पद अद्याप मिळालेले नाही, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

हेही वाचा >>> रश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप

गेल्या काही वर्षापासून विस्तव जात नसलेल्या शिंदे, पाटील यांच्यामध्ये राज्यातील सत्तातरानंतर मनोमीलन होईल अशी सुचिन्हे दिसत असतानाच आता पुन्हा मनसे आ. पाटील यांनी रस्ते, खड्डे, विकास कामे, आता घराणेशाही विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना प्रतिक्रिया, ट्वीटरच्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.आ. पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना ठाणे जिल्ह्यात शिंदे यांची घराणेशाही सुरू आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या मदतीशिवाय कल्याण लोकसभेचा खासदार निवडला जाऊ शकत नाही, असा इशारा दिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे समर्थकांनी तात्काळ मनसेचे आ. पाटील यांना प्रत्युत्तर देऊन बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : तोतया पोलीस अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्हा ही शिंदेंची घराणेशाही असेल तर मनसे ही काटई गाव प्रा. ली. कंपनी आहे. या कंपनीचे अस्तित्व काटई गाव हद्दी पुरते मयार्दित आहे. पुढे त्यांना कोणी विचारत आणि ओळखत नाही, असा टोमणा शिवसेना शिंदे समर्थक युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी मनसे आ. पाटील यांना लगावला. मनसेने हा आता किरकोळ विषयात न पडता आपलीे आमदार संख्या कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला खासदारकीची निवडणूक लढायची नाही तर मग खासदारकीची स्वप्ने का पाहता, असा चिमटा म्हात्रे यांनी काढला आहे.