ठाणे – येथील खारटन रोड परिसरातील बंद शौचालयात एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एकाला ठाणे नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ठाणे येथील खारटन परिसरातील एका बंद शौचालयात गुरूवारी अजय उर्फ बंटी अडसुळे याने सहा वर्षीय मुलीला नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी बंटी अडसुळे याला अटक केले. त्यास ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने सोमवार, १६ जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण हे करत आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.