News Flash

Social Viral : या फोटोतील साप शोधून तर दाखवा…

या चित्रातील साप शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला असून त्यावर विनोदी अशा प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. यावर अनेकदा वेगवेगळी कोडीही व्हायरल होतात आणि मग त्याचे उत्तर शोधण्यासाठी नेटीझन्समध्ये एकच स्पर्धा लागते. काहीवेळा यामध्ये वाळलेल्या पानांतील साप शोधायला सांगितलेला असतो, तर काही वेळा आणखी काही. नुकतेच असेच एक कोडे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन टेबल आहेत आणि त्यावर असलेले कुशन हे वेताच्या मटेरियलचे असल्यासारखे दिसत आहे. त्या दोन्ही कुशनवर काही मासिके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये साप कुठे दिसतो ते शोधा असे हे कोडे आहे.

ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स २४/७ यांनी ही इमेज आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केली आहे. आता हे दोन्ही टेबल आणि त्याखाली असलेली जमिन यावर सहजासहजी साप दिसणे कठीण आहे. जे हा साप शोधून काढतील त्यांना जास्तीचे पॉईंटस देण्यात येणार आहेत असेही या चित्राखाली म्हटले आहे. या चित्रातील साप शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला असून त्यावर विनोदी अशा प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. मात्र अद्याप अनेकांना हा साप नेमका कुठे आहे ते शोधता आलेले नाही. त्यामुळे पाहा बरं प्रयत्न करुन तुम्हाला हा साप शोधता येतो का ते…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2018 2:16 pm

Web Title: spot the snake challenge find from photo social viral
Next Stories
1 Kerala floods: सुट्टीवर असूनही ‘तो’ राहिला ‘ऑन ड्युटी’; पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
2 पंतप्रधानांचे नाव बदलले तरच भाजपाला मते मिळतील – केजरीवाल
3 पालघरमध्ये ऑनलाईन अंत्यसंस्कार, कुरियरने गुजरातला मागवल्या अस्थी
Just Now!
X