गुटखा खाऊन काकांनी गायले माणिक मागे हिते गाणं; नेटीझन्स म्हणतात यांच्यापुढे राणू मंडलही नापास!

हा व्हिडीओ १६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘रानू मंडलानंतर आता हे नवीन टॅलेंट’ असे लिहिले आहे.

gutkha uncle manika mage hite
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @giedde / Instagram )

सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस लोकप्रिय श्रीलंकन ​​गाणे ‘मानिके मागे हिते’ ची गाताना दिसत आहे. श्रीलंकन ​​गायक योहानी डिलोका डी सिल्वा यांनी त्यांच्या आवाजात गायलेले हे गाणे भारतात खूप लोकप्रिय झाले. योहानीच्या गाण्याची शैली आणि आवाज दोन्ही लोकांना आवडले. हे गाणे लोकप्रिय झाल्यानंतर त्यावर इन्स्टाग्राम रिल्सवर बनवल्या जाऊ लागल्या. इतकेच नाही तर लोकांनी या गाण्याचे विविध भाषांमध्ये रूपांतरही केले. या गाण्यावर लोकांनी जोरदार डान्सही केला.

गुटखा खाऊन गायले गाणे

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गुटखा खाऊन हे गाणे गुणगुणण्याचा प्रयत्न करत आहे. या गाण्याचे बोल तंतोतंत कॉपी करता येत नसले तरी शेवटचे शब्द तो बोलत आहे. काही सेकंदांसाठी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच हसायला येईल.

( हे ही वाचा: सिंहासोबत व्हिडीओ काढण्यासाठी त्याने बसची खिडकी उघडली अन्…)

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ १६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘रानू मंडलानंतर आता हे नवीन टॅलेंट’ असे लिहिले आहे. एका युजरने लिहिले की, ‘काकांना खैनी आणि गुटखा वेळेवर द्या यार, नाहीतर काका असे करू लागतात.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After eating gutkha uncle sang a song manik netizens say ranu mandal also failed in front of him ttg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या