Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंगाई गीत गात चिमुकलीला झोपवण्याचा प्रयत्न केला जात नाही पण मध्येच चिमुकली असे काही म्हणते की हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या बालपणीची आठवण येऊ शकते.
लहान मुलांना झोप लागावी, यासाठी जे गीत म्हटले जाते त्याला अंगाई गीत म्हणतात. अनेकदा बाळाला झोपवण्यासाठी आजही अंगाई गीत आवडीने म्हटले जाते. “बाळा कशी गाऊ अंगाई” या मराठी चित्रपटातील लोकप्रिय गीत “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई” अनेकदा लहान मुलांसाठी गायले जाते. या व्हिडीओमध्ये सुद्धा हेच गीत गाताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वडील आपल्या चिमुकलीला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. चिमुकली झोपावी म्हणून ते अंगाई गीत गाताना दिसत आहे. “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई” हे अंगाई गीत गाऊन ते चिमुकलीला झोपण्यास सांगत आहे पण चिमुकली मात्र झोपण्यास तयार नसते. ती मध्येच म्हणते, चंद्र झोपला नाही” त्यानंतर पुन्ह तिचे वडील तिला झोपण्यास सांगतात आणि अंगाई गीत गातात तेव्हा चिमुकली डोळे लावते पण काही क्षणातच पुन्हा डोळे उघडून मिश्किलपणे हसत म्हणते, “चंद्र झोपला नाही.” हा व्हिडीओ पाहून तुम्हाला पोट धरुन हसायला येईल. काही जणांना त्यांच्या मुलामुलींची आठवण येईल तर काहींना त्यांच्या आईवडिल किंवा आजीआजोबांची आठवण येईल.

हेही वाचा : कुत्र्यापेक्षा मांजर दहा पटीने हुशार! खिडकी उघडून पळाली अन् कुत्रा पाहतच राहिला, पाहा मजेशीर VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ovi_nayak या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चंद्र झोपला नाही मग मीच का झोपू? अंगाई म्हणू म्हणू अटाळा आला.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हीच झोपणार हा चंद्र .. लबाड लेकरू” तर एका युजरने लिहिलेय, “खूप गोड” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक वेळेस चंद्र झोपी जाईल पण मांडीवरचा चंद्र झोपणार नाही.”