Elephant disable electric fence viral video: हत्तींना पृथ्वी वरील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जाते. हत्ती किती हुशार असतात हे दर्शवणारे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी हत्ती फुटबॉल खेळताना दिसतो तर कधी पाईप सोंडेत पकडून अंघोळ करताना दिसतो. कधी बर्थडे केकवर ताव मारताना दिसतो तर कधी विद्युत प्रवाह सुरू असलेले वि‍जेचे कुंपण हुशारीने ओलांडताना दिसतो. हत्तीची हुशारी सिद्ध करणारे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हत्ती जितके हुशार असतात तितकेच भावनिकही असतात. हत्ती कधी केअर टेकरला पावसातून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर कधी पिल्लाला पाणी पाजणाऱ्या व्यक्तीचे आभार व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर हत्तीचा असाच एक नवीन व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये भुकेले हत्ती त्याची भूक भागवण्यासाठी जे कृत्य करतो ते पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

निवृत्त भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, “हत्तींचा एक कळप एका रांगेत रस्त्यावरून शांतपणे चालताना दिसत आहे. हत्तीच्या पाठीवर माहूत बसलेले दिसत आहेत. पण छोटेसे हत्तीचे पिल्लू देखील त्यांच्याबरोबर चालत आहे, ज्याला प्रेमाने “छोटू” असे नाव दिले होते. त्यानेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भूकेल्या हत्तीच्या पिल्लाला रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला फळांनी भरलेल्या हातगाडी दिसते. ते पाहातच तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि धावतच तो विक्रेत्याजवळ केला. अचानक हत्ती आलेला पाहून विक्रेता घाबरून दुसर्‍या बाजूला गेला. पण विक्रेत्याच्या तिथे उभी असलेली एका महिला शांतपणे ऊसाच्या तुकड्यासारखा दिसणारा पदार्थ छोटू हत्तीला खायला देते जो तो सोंडेत पकडतो आणि खातो. ते खाऊनच तो खुश होतो आणि आपल्या वाटेने निघून जातो.

नंदाच्या शेअर केलेल्या व्हिडीओच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “छोटूसाठी झटपट नाश्ताचा ब्रेक. गोंडस,” . व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अल्पावधीमध्येच व्हायरल झाला.

सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव झाला. “सर्व हत्तींच्या पिल्लांना कधीही आणि कुठेही कोणतेही अन्न मिळावे,” असे एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “ती महिला हत्तीच्या पिल्लाला कसे खायला घालते ते मला आवडले.”

सर्वांनाच मजा आली नाही. अनेक वापरकर्त्यांनी हत्तीच्या या कृतीबाबत चिंता व्यक्त केली. “काँक्रीटच्या रस्त्यांवर चालणारे हत्ती काय गोंडस आहेत? त्यांनी जंगलात मुक्तपणे फिरायला हवे नाही का?” एका दर्शकाने विचारले.

दुसऱ्यानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केला: “मला या संपूर्ण दृश्याबद्दल एक समस्या आहे – वन्य प्राणी नैसर्गिक अन्न स्रोतांसह हिरव्या जंगलात राहतात, शहरी जागांमध्ये नाही.”

तरीही, अनेकांनी त्या गोंडस क्षणावर लक्ष केंद्रित केले. “आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हत्तीचे पिल्लू त्यांनी स्वत:हून फळ देण्याची वाट पाहत आहे. सुंदर,”

“छोटू(हत्तीचे पिल्लू) खूप गोंडस आहे,” एका वापरकर्त्याने म्हटले.

एका वापरकर्त्याने म्हटले, “तुम्ही लक्षात घेतले असेल की, छोटू(हत्तीचे पिल्लू) अन्न ओढत नाही. तो फक्त ती महिला त्याला त्याचा नाश्ता देईपर्यंत धीर ठेवून वाट पाहतो. लहानपणापासूनच ते सज्जन वर्तन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले असे म्हणण्यास हरकत नाही.