Aditi Rao Hydari Siddharth Secret Marriage : बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या लग्नाची सध्या सर्वत्र चालू आहे. १६ सप्टेंबरला अदितीचा विवाहसोहळा तेलंगणात पार पडला. सध्या तिच्या लग्नाचे फोटो, अभिनेत्रीचा एकंदर दाक्षिणात्य लूक याची चांगलीच चर्चा होत आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून अदिती गुगलवर देखील ट्रेंड होत आहे. trends.google नुसार, अदिती राव हैदरीबद्दल माहिती सर्च करणाऱ्यांच्या आकडेवारी तब्बल हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत अदितीबद्दलचे दोन लाख प्रश्न गुगल सर्च मध्ये नोंदवण्यात आले.

अदितीने ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थबरोबर १६ सप्टेंबरला गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यांच्या रोमँटिक फोटोंना सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळाली आणि यामुळेच अदितीच्या लग्नाबद्दल सर्वत्र कुतूहल निर्माण झालं. अभिनेत्रीबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी तिच्याविषयीची माहिती सर्च करण्यात आली. अदिती आणि सिद्धार्थने हे लग्न खाजगी व कुटुंबीयांपर्यंत मर्यादित कसं ठेवता येईल याची पुरेपूर काळजी घेतली होती.

aditi
अदिती राव हैदरी ( Aditi Rao Hydari ) गुगलवर ट्रेंड  (फोटो – गुगलवरून साभार)

अदिती-सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा

अदिती ( Aditi Rao Hydari ) व सिद्धार्थने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर एकत्रितपणे शेअर केले होते. त्यांच्या लग्नाचे खास क्षण, दोघांचा दाक्षिणात्य लूक याचे फोटो त्वरित व्हायरल झाले. तेलंगणातील वानपर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापूर येथील ऐतिहासिक श्री रंगनायकस्वामी मंदिरात हा सोहळा पार पडला. या मंदिराजवळचे दोघांचे फोटो देखील लक्षवेधी ठरले होते. तेलंगणामधलं हे मंदिर जवळपास ४०० वर्षे जुनं आहे. हे मंदिर १८ व्या शतकातील असून अदितीच्या कुटुंबाचं या मंदिराशी खास नातं आहे. लग्नात दाक्षिणात्य संस्कृती व परंपरा जपल्याने या जोडप्याचं विशेष कौतुक करण्यात आलं.

अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीनुसार पार पडला. अभिनेत्रीने लग्नात गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने देखील दाक्षिणात्य संस्कृतीला साजेसा असा लूक केला होता. अदिती-सिद्धार्थचं लग्न त्यांच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांसाठी सुखद धक्का होता. दोघांनीही अचानक लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदिती-सिद्धार्थने लग्नाची घोषणा केल्यावर यावर नानी, करण जोहर, राशी खन्ना, अनन्या पांडे, जिनिलीया डिसूझा, अथिया शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, शोभिता धुलिपाला, भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.