Shiv Jayanti 2024 : दरवर्षी १९ फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम व्यक्त करतात. एकमेकांना शुभेच्छा पाठवतात. महाराजांचा इतिहासाला उजाळा देतात. गड किल्ल्यांना भेट देऊन महाराजांना अभिवादन करतात. जागोजागी प्रत्येक चौकात शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स किंवा बॅनर लावलेले दिसतात. सध्या असाच एक बॅनरचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की असा बॅनर कुठेही बघितला नाही. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल फोटो

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला एक पांढरा पेपरवर बॅनर दिसेल. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चार प्रतिमा दिसत आहे. बॅनरच्या अगदी वरच्या बाजूला “जय भवानी हर हर महादेव जय शिवाजी शहाजी राजे भोसले’ लिहिलेय. त्या खाली ‘जय शाहू’ आणि ‘जय जिजाऊ’असे सुद्धा लिहिलेय.

बॅनरवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली लिहिलेय, ” शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंती उत्सव २०२०-२१ पंचवटी नगर, गणेश मित्र मंडळ ग्रुप धुळे.” आणि त्याखाली चिमुकल्यांचे पासपोर्ट साइज फोटो सुद्धा लावले आहे. फोटो खाली या चिमुकल्यांचे नावे लिहिलेय.

या व्हायरल फोटोतील बॅनरवरील माहिती वाचून तुम्हाला कळेल की हे बॅनर शिवजयंती निमित्त लहान मुलांनी बनवले आहे. हे बॅनर पाहून तुम्हीही थक्क व्हाव. लहान मुलांच्या क्रिएटिव्हीटीचे कौतुक करावे तिकते कमी आहे पण हे जुने बॅनर आहे जे आता शिवजयंतीनिमित्त पुन्हा व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

marathiveda या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्याता आला असून या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पैशाची नाही तर मनाची श्रीमंती बघा, असा बॅनर अख्या महाराष्ट्रात नसेल.” या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लय भारी” तर एका युजरने लिहिलेय, “अविश्वसनीय” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम” काही युजर्सनी ‘जय शिवराय’चा जयघोष केला आहे. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.