Crocodile attack video: मगर ही किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीमध्ये असते. त्यामुळेच काही जण मगरीला बोन ब्रेक मशीन, असेसुद्धा म्हणतात. अन् मगर जर का पाण्यात असेल, तर मग काय विचारायलाच नको. पाण्यात तर ती सिंहालासुद्धा लोळवू शकते. पण विचार करा, तुम्ही पाण्यात पोहत आहात अन् असा एखादा खतरनाक शिकारी अचानक तुमच्यासमोर आला, तर तुम्ही काय कराल? सध्या अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक १३ वर्षांचा मुलगा नदीकाठावर उभा राहून म्हशीला अंघोळ घालत होता. तेवढ्यात पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीनं त्याच्यावर हल्ला केला आणि त्या मुलाला घेऊन ती खोल पाण्यात निघून गेली. याचा धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

मुलगा नदीच्या काठावर उभा राहून म्हशीला अंघोळ घालत होता. तेवढ्यात पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीनं त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून खरंच तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

ही घटना उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील घाघरा नदीत घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी आसपास उभ्या असलेले गावकरी हे सर्व दृश्य प्रत्यक्षात तिथे पाहत होते; मात्र मगरीचे पाण्यातले ते रौद्र रूप पाहून, कोणीही त्या जीवावर बेतलेल्या मुलाच्या मदतीसाठी पुढे जाण्याचे धाडस दाखवू शकले नाही. मुलगा प्राणांतिक किंकाळ्या मारत होता आणि मगर आपली पकड आणखी घट्ट करीत राहिली. व्हिडीओमध्ये तुम्ही नीट पाहिलं, तर या मुलाचं डोकं काही सेकंदांसाठी पाण्याबाहेर येताना दिसतं. त्यावरून तो मुलगा जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करीत होता हे लक्षात येतं.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sirajoorani नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “गावकऱ्यांनी काहीतरी प्रयत्न करायला हवे होते” तर आणखी एकानं मदत न करता, व्हिडीओ काढणाऱ्यांवर टीका केली आहे.