scorecardresearch

नदी ओलांडणाऱ्या हरणाचा मगरीकडून पाठलाग; पाहा घटनेचा थरारक Video

शांततेने नदी ओलंडणाऱ्या हरणावर केला मगरीने हल्ला, नदीकाठी पोहोचताच जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल…

crocodile attack on deer video
photo: social media

Viral Video: चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्ही हादरून जाल. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मगर हरणाचा पाठलाग करताना दिसत आहे. नदी ओलांडत असताना मगरीने केलेला हल्ला याच नदीमधून जात असणाऱ्या एका बोटीमधल्या पर्यटकांनी कॅमेरात कैद केला आहे. निर्माते कपारी यांनी या व्हिडीओचा शेवट थक्क करणारा असल्याचं सांगितलं आहे. तुम्हीही तो नक्की पाहा..

व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘विझडम ऑफ द लायन’ नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हरीण नदी ओलांडताना दिसत आहे. तेवढ्यात एक मगर त्याचा पाठलाग करते. तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे मगर आणि हरणामधील अंतर हळूहळू कमी होतं आहे.

मगरीला शिकार दिसताच वेग वाढवला..

मगरीने हरणाला पाहताच आपला वेग वाढवला आणि त्याच्याजवळ पोहोचताच हल्ला केला. त्यानंतर हरीण काही क्षणासाठी पाण्याखाली गेले. हरीण मगरीच्या तावडीत सापडले असतानाच अचानक हरीण पाण्यातून वर आलं. त्यानंतर हरणाने पाण्यातच उडया मारायला सुरुवात केली आणि नदीकाठी धावू लागलं. नदीकाठी पोहोचताच हरणाने सुटकेचा निःश्वास सोडला.

येथे पाहा घटनेचा थरारक व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: मुंबईच्या लोकलमध्ये अशी होते प्रवाशांची अवस्था; नेटकरी म्हणाले ‘आमच्यासोबतही…’)

महिलांनी आरडाओरड केली..

हा सारा प्रकार पर्यटकांच्या नजरेसमोर घडतं असल्याने ते आरडाओरड करू लागले. हरीणाची सुखरुपणे सुटका झाल्यानंतर बोटीमधील महिलांनी आरडाओरड करत आनंद साजरा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निर्माते कापरी यांनी, “एक टॉप क्लास क्लायमेक्स” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत २६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:52 IST