Elderly Man Dance Viral Video: वय ही फक्त एक संख्या आहे, हे सिद्ध करणारा एक जबरदस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जिथे आजची पिढी तणाव आणि नैराश्याने भरलेली आहे, तिथे एका वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या उत्साहपूर्ण डान्सने लाखोंच्या मनावर राज्य केलं आहे. उत्साह आणि आनंद याला वयाचं बंधन नसतं, हे सिद्ध करणारा एक वयोवृद्ध व्यक्ती सध्या सोशल मीडियाचा सुपरस्टार ठरतोय. त्यांचा एका जुन्या हिंदी गाण्यावरचा जबरदस्त डान्स पाहून तरुणही थक्क झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर डान्स व्हिडीओजची चलती आहे, पण काही व्हिडीओ असे असतात, जे क्षणात लोकांच्या काळजाला भिडतात आणि इंटरनेटवर तहलका उडवतात. असाच एक जबरदस्त डान्स व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे, ज्यात एका वयोवृद्ध व्यक्तीने कुमार सानूच्या गाण्यावर धमाल परफॉर्मन्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हिडीओमध्ये १९९३ मधील लोकप्रिय चित्रपट ‘फूल और अंगार’मधील ‘चोरी चोरी दिल तेरा’ या गाण्यावर तीन जण डान्स करताना दिसतात. पण, या संपूर्ण परफॉर्मन्सचा स्टार ठरतो नवीन भारद्वाज नावाचे वयोवृद्ध व्यक्ती. वयाचा काहीही अडथळा न मानता त्यांनी ज्या जोशात आणि आत्मविश्वासात प्रत्येक स्टेप परफॉर्म केल्या, ते पाहून तरुणाईलाही थक्क व्हायला झालं आहे. वयोवृद्ध व्यक्तीने कुमार सानूच्या गाण्यावर दिलेल्या झकास परफॉर्मन्सने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत नवीन हे मधोमध दिसतात आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना दोन सहकलाकार आहेत. तिघांनी मिळून अगदी सहज आणि मजेशीर स्टेप्स करत गाण्याला चारचाँद लावले. विशेष म्हणजे नवीन यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं, “Easy Dance Step 018”, आणि तेव्हापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला ४६ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले असून, नेटकरी त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.
एका युझरने लिहिलं, “क्यूट वाटताय तिघंही”, दुसऱ्याने म्हटलं, “दादाजी सुपर डुपर हिट आहेत”, तिसऱ्याने तर त्यांना “सुपर दादा जी” असं टायटलच देऊन टाकलं. तर चौथा म्हणाला, “जर तुम्ही अजून एकाला सामील करू शकता, तर मी लगेच तयार आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओने हे सिद्ध केलं की, उत्साहासाठी वयाचं बंधन नसतं.