Mumbai kurla video: असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. मात्र हाच रेल्वेचा प्रवास आता जीवघेणा ठरत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सध्या कुर्ला स्टेशनवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जिथे कुर्ला स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटून अक्षरश: प्लॅटफॉर्मवर पडली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही सावध व्हा आणि कुर्ला स्टेशनवर जाताना सावध राहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुर्ला रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली आहे. कारण, ट्रेनच्या वरची विजेची तार तुटून अक्षरश: प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळावर आली आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, या तारेतून कशाप्रकारे वीजप्रवाह जात आहे. चुकून या वायरजवळ कुणी गेलं जरी तरी तिथेच त्याची राख होईल एवढी भयानक परिस्थिती तिथे आहे. त्यामुळे कुर्ला रेल्वे स्टेशनवर प्रवास करताना आजूबाजूला पाहून प्रवास करा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. दररोजच्या अपघातांमुळे अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे ही शहरातील एक महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे, परंतु येथे प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नाही. दररोज अनेक प्रवासी लोकल ट्रेनमध्ये चढताना-उतरताना किंवा रुळ ओलांडताना अपघात होऊन मृत्युमुखी पडतात. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडताना किंवा लोकल ट्रेनमध्ये चढताना-उतरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ cop_mr.neel_21 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत