होस्टेलमध्ये राहणारी मुलं त्यांना मिळणारं जेवण चांगलं नसल्याच्या तक्रारी अनेकदा करत असतात. शिवाय जे होस्टेलमध्ये राहिले आहेत त्यांना अशा गोष्टींचा नक्कीच अनुभव आला असेल. कधीकधी या जेवणावरुन होस्टेल प्रशासन आणि मुलांमध्ये वाददेखील होतात. सध्या असेच एक प्रकरण उघडकीस आलं आहे, ज्यामध्ये होस्टेलमध्ये मिळणाऱ्या बबाटा भाजीवरुन विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), मुरैना येथील मुख्याध्यापक आणि काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. ही घटना मध्य प्रदेशातील जडेरुआ भागात राष्ट्रीय महामार्ग ४४ जवळ ही घटना घडली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोहक नावाच्या एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांसह आयटीआय वसतिगृहाचे मुख्याध्यापक जीएस सोलंकी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना जेवणात फक्त बटाट्याची भाजी दिली जाते जी नमूद केल्याप्रमाणे मेनूमध्ये नाही, अशी तक्रार केली.

हेही पाहा- ब्रेकअपनंतर तरुणीने प्रियकराला पाठवलं विचित्र पार्सल, रुममेटने शेअर केलेला स्क्रीनशॉट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

शिवाय या भाजीसी संबंधित तक्रारीचा अर्ज विद्यार्थ्यांनी यापूर्वीदेखील केला होता, मात्र मुख्याध्यापकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपदेखील विद्यार्थ्यांनी केला आहे. याच कारणावरुन मुख्याध्यापक आणि मोहक यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. यावेळी रागवलेल्या मुख्याध्यापकांनी मोहकचा जोरात हात खेचल्याच व्हिडीओत दिसत आहे. शिवाय मुख्याध्यापकांनी त्याला मारहाण केल्याचं आरोपदेखील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तिथे उपस्थित इतर विद्यार्थी या दोघांमधील वाद थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

हेही पाहा- मुंबई लोकलमध्ये ‘आई’ने बाळासाठी लावली डोक्याची बाजी; Video पाहून लोकं म्हणाली, “मराठी बाई म्हणजे…”

दरम्यान, या प्रकरणाची तक्रार विद्यार्थ्यांनी मुरैनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांच्याकडे केली, त्यांनी तहसीलदार कुलदीप दुबे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तहसीलदार दुबे यांनी वसतिगृहाला भेट देऊन अधिकाऱ्यांना मेनूप्रमाणे जेवण तयार करण्याच्या सूचना देऊन प्रकरण मिटवल्याची माहिती समोर आली आहे.