Qatal Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धीसाठी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘शेकी शेकी’ ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘पीलिंग्स’ अशी गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. पण, सध्या एक गाणं खूप ट्रेंडिंग होतंय, ते म्हणजे कतल.
‘कतल’ हे गाण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होतंय. या गाण्यावर अनेक इन्फ्ल्यूएन्सर्ससह कलाकारदेखील या गाण्यावर थिरकताना दिसतायत. अशातच काही वयोवृद्ध महिलादेखील या गाण्यावर थिरकल्या आहेत.
कतल गाण्यावर आजींचा डान्स (Elder Women Qatal Dance Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, पाच वयोवृद्ध महिला कतल या हिंदी गाण्यावर थिरकताना दिसतायत. एकाच रंगाची साडी नेसून या पाचहीजणी अगदी जोशात डान्स करताना दिसतायत. अगदी हुबेहूब डान्स स्टेप करत या पाचही आजींनी सगळ्यांचं मन जिंकलंय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @shantai_second_childhood या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच जोपर्यंत ओजी (OG-Original) या गाण्यावर डान्स करत नाहीत, तोपर्यंत ट्रेंड संपलेला नाही, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
आजींच्या डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एक नंबर”, तर दुसऱ्याने “खूपच भारी” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “खूप गोड आहेत सगळ्या काकी, तुम्ही तरुण मुलींनापण मागे टाकले, अजून छान छान रील्स बनवा, खूप प्रेम तुम्हाला ” तर एकाने “आजींचा नादच खुळा” अशी कमेंट केली.