Shocking Cricket video: क्रिकेट खेळताना मृत्यू होणे ही काही नवीन बातमी नाही अश्या अनेक बातम्या आपण आजवर वाचल्या आहेत. क्रिकेट खेळताना अचानक कोसळल्याने मृत्यू किंवा चेंडू लागून मृत्यू, खेळताना हृदयविकाराचा झटका आणि मृत्यू असे अनेक मृत्यू खेळाच्या मैदानात झाले आहे. दरम्यान असंच एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलं आहे. यामध्ये एका तरुणानं कॅच घेतला आणि खाली कोसळला. याचा थरारक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही कळेल क्रिकेट खेळताना किती सावध राहिलं पाहिजे.

क्रिकेटचा खेळ पाहणे आणि खेळणे जितके आनंददायी आहे, तितकाच हा खेळ अनेकवेळा धोकादायकही ठरतो. क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडू चेंडू लागून जखमी होतात. असाच हा खेळाडू खेळता खेळता अचानक कोसळला. क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण सामना जिंकण्याची इच्छा मनात ठेवूनच मैदानात उतरतात. क्रिकेट सामना सुरु असताना एक खेळाडू आयुष्याची मॅच हरता हरता राहिला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मॅच सुरु आहे यावेळी एका खेळाडूनं फलंदाजी केली असताना दुसरा खेळाडू बॉल पकडण्यासाठी उडी मारायला गेला आणि थेट छातीवर, तोंडावर आपटला तो उठलाच नाही. यानंतर सर्व खेळाडू त्याला उठवायला गेले मात्र तो बेशुद्ध झाला होता. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान सुदैवानं या तरुणाची प्रकृती सध्या स्थीर असल्याची माहिती मिळालेली आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

एखाद्या खेळाडूला दुखापत झाली नसेल असं होणं अशक्य आहे. दररोज खेळणाऱ्या खेळाडूंना दुखापत ही होतच असते. कारण खेळ म्हणजे दुखापत आलीच. खेळाडू कितीही चांगला असला तरी दुखापत होतेच. क्रिकेट हा खेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडता. गल्लीपासून ते भव्य दिव्य मैदानांपर्यंत खेळला जाणारा हा खेळ. गावोगावी क्रिकेटचं फॅड आहे. मुलं तहानभूक विसरुन क्रिकेट खेळत असतात. मात्र क्रिकेट खेळताना म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. गार्ड किंवा हेल्मेट गावांकडे क्रिकेट खेळताना वापरलं जात नाही. त्यामुळं डोक्याला चेंडू लागणे किंवा शरीराच्या इतर अंगाना चेंडू लागून खेळाडू जखमी होण्याच्या अनेक घटना समोर येतात. यात खेळाडू गंभीर जखमी होतात किंवा काही वेळा जीवानिशी जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: असा बॉस कुणाला मिळू नये! कर्मचाऱ्याचा अपघात; बॉस विचारतो “ऑफिसला कधी येशील ते सांग” चॅट वाचून सांगा चूक कुणाची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ritya_don_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.