Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. तुम्ही लहान मुलांना आजवर डान्स करताना, गाणी म्हणताना किंवा दंगामस्ती करताना पाहिले असेल पण तुम्ही कधी एखाद्या चिमुकल्याला हातात पाल पकडताना पाहिले आहे का? तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? हो, हे खरंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल ज्याने हातात पाल पकडली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल. त्याने हाताात पाल पकडली आहे आणि हातात पाल पकडून तो घरभर फिरतोय. सुरुवातीला वाटते की ही पाल खोटी असेल पण जेव्हा हा चिमुकला पाल खाली जमीनीवर ठेवते आणि ती पाल पळत सुटते तेव्हा सर्वांचा विश्वास बसतो की ती पाल जिवंत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा चिमुकला त्या पॉलच्या मागे धावतो आणि पाल पकडण्याचा प्रयत्न करतो पण पाल त्याला पाहून आणखी पळताना दिसते पण शेवटी चिमुकला पालीला पकडतो. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्या अंगावर काटा येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
syed_afjal_ali_786 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”एका चिमुकल्याला घरातील लोक घाबरतात. तुम्हीही पाहा, तुम्हीही अवाक् व्हाल.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लहान मुले देवाचा अवतार असतात. त्यांचे कोणीही काहीही बिघडू शकत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा चिमुकला मागच्या जन्मात चीनमध्ये असेल.” अनेक युजर्सनी या चिमुकल्याच्या धाडसीपणाचे कौतुक केले आहे तर काही लोकांनी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
लहान मुलांचे अनेक व्हिडीओ समोर येतात. काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा आणखी एक असाच मजेशीर व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये दिसते की चिमुकला भजन सुरू असताना मध्येच झोपतो, त्यामुळे त्याला झोपेतून उठवण्यासाठी सर्व जण मोठमोठ्याने भजन सुरू करतात. यावेळी तो जागा होतो आणि सर्वांकडे पाहून टाळ्या वाजवतो. त्याला खूप येत असते पण तरीसुद्धा तो टाळ्या वाजवताना दिसतो. या चिमुकल्याकडे पाहून सर्वजण हसतात आणि काही जण व्हिडीओ शूट करतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.