Tsunami Video Flood: गेल्या काही दिवसांपासून हरिद्वारमध्ये मुसळधार पाऊस पडत असताना, एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला असल्याचे आमच्या लक्षात आले. यात दावा केला जात आहे की, हा हरिद्वारमधील पुराचा अलीकडील व्हिडीओ आहे. आपण पाहू शकता की, अनेक वाहने पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे पाण्याचे लोट गोल गोल फिरत आहेत आणि त्यात गाड्या सुद्धा फिरताना दिसत आहेत. तपासादरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमला या व्हिडीओतील प्रचंड पुरामागील कारण असलेल्या त्सुनामीची माहिती मिळाली आहे.

काय होत आहे व्हायरल?

YouTube चॅनेल Jaimaakarniofficial वर व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओवरून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्चमुळे आम्हाला यूट्यूब चॅनल, पर्ड्यू इंजिनिअरिंगवर अपलोड केलेले व्हिडीओ आढळून आले. ज्याचे हेडिंग आहे: Tsunami Study Shows Seawalls and Coastal Forests Reduce Damage in Japan

या व्हिडीओमधील व्हिज्युअल्स व्हायरल यूट्यूब शॉर्टमधील दृश्यासारखेच दिसत होते.

व्हिडीओवरील टाईम स्टॅम्प 3/11/2011 दर्शविते, ज्यातुन लक्षात येतं की व्हिडीओ साधारण २०११ चा असावा. रिव्हर्स इमेज सर्च दरम्यान, आम्हाला TBS NEWS DIG Powered by JNN या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ देखील सापडला. २.२० मिनिटांच्या सुमारास हरिद्वारचा असल्याचे नमूद केलेले आढळते आढळते.

फॅक्ट चेक स्टोरीज वाचा<< DRDO चे अधिकारी प्रवास करत असणाऱ्या बसवर मॅग्नेटिक बॉम्बचा हल्ला? पेटत्या बसचा धडकी भरवणारा Video, दुर्घटनेची खरी बाजू पाहा

जपानी भाषेतील शीर्षक (अनुवाद): त्सुनामीने मियाको सिटी, इवातेच्या किनारी भागात धडक दिली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: जपानच्या त्सुनामीचा जुना व्हिडीओ हरिद्वारमधील पुराचा असल्याच्या दाव्यासह व्हायरल दावा खोटा आहे.