Viral Video : मुले ही देवाघरची फुले असतात. ते अतिशय निर्मळ स्वभावाचे असतात. निरागस लहान मुले कधी काय बोलतील, हे सांगता येत नाही. ते कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी फार विचार करत नाही. अनेकदा याच कारणाने पालक अडचणीत सापडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या मुलासह आरती करताना दिसत आहे. पुढे आरतीदरम्यान मुलगा असं काही बोलतो की त्याच्या आईला काहीही सुचत नाही. नेमकं काय घडतं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकला त्याच्या आईसह देवघरासमोर बसलेले आहे. आई “अम्बे तू है जगदम्बे काली” ही आरती म्हणताना दिसत आहे. या आरतीतील एक ओळ ती गाते, “नहीं मांगते धन और दौलत, न चांदी न सोना।” हे ऐकताच मुलगा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, “अगं आई किती खोटं बोललीस. बाबाकडून दररोज वाद घालून सोने बनवते, पैसे घेते आणि देवाबरोबर खोटं बोलते.” हे ऐकून ती मुलाला शांत बसण्यास सांगते.
असं वाटतं की हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवला आहे पण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

cute_taddy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बच्चे मन के सच्चे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुले देवाचे स्वरुप असतात” तर एका युजरने लिहिलेय, “मुलाने आपल्या आईचा खरा स्वभाव सांगितला” आणखी एका युजरने लिहिलेय, “देवाने सत्य समोर आणले शेवटी” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी असे पालक आणि मुलांचे मनोरंजनासाठी बनवलेले व्हिडीओ व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. देवाजवळ प्रार्थना करणाऱ्या चिमुकल्याला जेव्हा त्याची आई ‘देवाला बुद्धी माग” असं म्हणते त्यावर चिमुकल्याने तिला मजेशीर उत्तर दिले होते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.