Viral Photo : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही पोस्ट मजेशीर असतात तर काही पोस्ट थक्क करणाऱ्या असतात. काही पोस्ट तर भावुक करणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कोणाचेही डोळे भरून येईल. हा फोटो एका हसत्या खेळत्या छोट्याशा कुटुंबाचा आहे, ज्याला कुणाची तरी नजर लागली. नेमकं काय आहे, या फोटोमध्ये? आणि या कुटुंबाबरोबर काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा फोटो पाहावा लागेल.

या व्हायरल पोस्टमध्ये एकाच ठिकाणचे तीन फोटो दिसत आहे. पहिला फोटो २०२२ चा आहे. त्यामध्ये दोघे नवरा बायको आणि एक छोटेसं बाळ आहे. दुसरा फोटो हा २०२३ चा आहे. या फोटोमध्ये सुद्धा दोघे नवरा बायको आणि त्यांची थोडी मोठी झालेली चिमुकली मुलगी दिसत आहे. आणि शेवटचा फोटो हा २०२५ चा आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती मिसिंग आहे ती म्हणजे बायको. या फोटोमध्येवडील आणि थोडी आणखी मोठी झालेली चिमुकली दिसत आहे पण या फोटोमध्ये तिची आई दिसत नाही. या चिमुकलीची आई कुठे आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचे उत्तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये चिमुकलीच्या वडिलांनी दिले आहे.

व्हायरल फोटो

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,

“डिअर गॉर्जियस,
तुझ्याशिवाय आयुष्य खरोखर कठीण आहे… २५ डिसेंबर ते २५ जून आज ६ महिने झाले आहेत आम्ही तुझ्याशिवाय आयुष्य जगत आहोत. आत खोलवर दु:खत असताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे खूप कठीण असते. सर्वांबरोबर हसणे पण एकटे शांतपणे रडणे खूप कठीण आहे. आपल्या चिमुकलीला आनंदी ठेवणे कठीण आहे, कारण तिला माहित आहे की ती तिच्या आईशिवाय मोठी होत आहे. प्रवास करणे आणि त्या ठिकाणांचा आनंद घेणे सुद्धा खूप कठीण आहे, त्याच क्षणी तुझी सर्वात जास्त आठवण येते. जेव्हा माझा आतला आवाज अजूनही तुला शोधत असतो, तेव्हा जगाला दाखवणे कठीण आहे की मी ठीक आहे आणि आयुष्यात पुढे गेलो.

गेल्या ४ वर्षात आपण खूप प्रवास केला. आपण दरवर्षी या ठिकाणी भेट देण्याचे वचन दिले होते, परंतु तुझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे आम्ही २०२४ मध्ये ते वगळले. या वर्षी, मी आणि सिसिरा योगायोगाने या ठिकाणी गेलो – आणि तो क्षण मला आठवला. मला तुझी खूप आठवण येत होती, पण तरीही आम्ही एकदा एकत्र काढलेला तोच फोटो काढण्याचे ठरवले. असे आयुष्य जगणे खरोखरच खूप कठीण आहे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ मुली साठी जग” तर एका युजरने लिहिलेय, “हृदयद्रावक फोटो” अनेक युजर्सनी या पोस्टवर सॅड इमोजी शेअर केले आहेत.