Thief Viral Video : सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे खळखळून हसवणारे असतात, तर काही आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक हास्यास्पद व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात घरात चोरीसाठी आलेल्या चोराचा चक्क जंगी वाढदिवस साजरा केला जातोय. एखाद्या चोराला चोरी करताना पकडल्यानंतर लोक त्याला मारत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण, या व्हिडीओत चक्क चोराचा वाढदिवस साजरा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशा प्रकारे साजरा केला चोराचा वाढदिवस

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणासमोर केक आहे. यावेळी त्याच्या बाजूला असलेली व्यक्ती त्याची ओळख करून देत सांगतेय की, आमच्या परिसरात एक चोर पकडला गेला आहे आणि त्याने आम्हाला सांगितले की, आज त्याचा वाढदिवस आहे. म्हणूनच आज आपण त्याचा वाढदिवस साजरा करीत आहोत.

हेही वाचा – PHOTO : “ताटामध्ये हात घालून…”, असा अपमान फक्त पुण्यातच! वडापावच्या गाडीवरील पुणेरी पाटी वाचून पोट धरून हसाल

त्यानंतर चोर केक कापत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. केकजवळ चोराने चोरी करण्यासाठी वापरलेल्या चार चाव्या आणि एक पकडीसारखी वस्तू ठेवली आहे. ती वस्तू बाजूला ठेवत की व्यक्ती म्हणतेय की, यावर त्याचे पोट आहे. चोराने केक कापताच त्या व्यक्तीने केकचा मोठा तुकडा उचलला आणि त्याच्या तोंडात कोंबला. यावेळी त्याच्या आजूबाजूला असलेले लोक हॅपी बर्थडे चोर भावा, असे गाताना ऐकू येत आहे. विशेष म्हणजे केकवर नावही चोर, असे लिहिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोकांचे खूप मनोरंजन करीत आहे.

View this post on Instagram

A post shared by Indian Pot (@indianpot)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोराचा हा मजेशीर व्हिडीओ @Indianpot नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. तो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हॅप्पी बर्थडे चोर भावा म्हणत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी, चोराचा असा सन्मान पहिल्यांदाच झाला असेल, असे म्हटले आहे.