scorecardresearch

Video: माऊच्या बाळासमोर विषारी रसेल वायपर सापाची शक्ती आटली; अंगावर काटा आणेल ‘ही’ लढाई

Viral Snake Video: भीतीदायक सापाशी इवल्याश्या मनीमाऊच्या पिल्लाने असा काही पंगा घेतला आहे की बघणारे अक्षरशः थक्क झाले आहेत.

Video: माऊच्या बाळासमोर विषारी रसेल वायपर सापाची शक्ती आटली; अंगावर काटा आणेल ‘ही’ लढाई
Viral Video Kitten Fights with poisonous russell viper snake (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Snake Video: सापाचं पिल्लू जरी अचानक वाटेत आलं तरी भल्याभल्यांना धडकी भरते. काल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात तर सापाने एंट्री घेऊन दोन्ही संघाच्या खेळाडूंची पंचाईत केली होती. तुम्हीही तो क्षण पाहिला असेलच ना? पण आता अशाच एका भीतीदायक सापाशी इवल्याश्या मनीमाऊच्या पिल्लाने असा काही पंगा घेतला आहे की बघणारे अक्षरशः थक्क झाले आहेत. इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण साप व माऊची लढाई पाहू शकता. स्वतःपेक्षा दहा पट शक्तिशाली सापाशी लढताना माऊने दाखवलेली जिद्द व हिंमत पाहून अनेकांनी आपल्यातही असाच आत्मविश्वास असता तर अशी इच्छा व्यक्त केली आहे.

@10_viper_21 या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की रसेल वायपर नावाचा विषारी साप आणि माऊच्या बाळात झुंज पेटली आहे. सापाचे विषारी हल्ले उडवून लावताना माउचे बाळ जिगरीने लढत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल २१ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या लढाईत नेमकं कोण विजयी होतं हे आम्ही आपल्याला सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओ पाहूनच मजा घ्या..

Video: जेव्हा सुंदर तरुणी रस्त्यातच भांडू लागल्या; एकीने तर केस खेचून जे केलं.. बघ्यांची गर्दी चक्रावुन गेली

माऊच्या बाळाचा सापाशी पंगा

ट्विटरला का ट्रेंड होतंय #Snake?

दरम्यान काल पासून जर आपण ट्विटरसहित अन्य सोशल मीडिया साईट्स पाहिल्या सास्तील तर आपल्या लक्षात येईल की #Snake प्रचंड व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे २ ऑक्टोबरला भारताची दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध रंगलेली मॅच. काल सामना सुरु असतानाच अनपेक्षितपणे मैदानात एका सळसळत्या सापाने प्रवेश केला होता. यानंतर सामना काहीवेळ खोळंबला होता दरम्यान या सापाचे अनेक व्हिडीओ व फोटो शेअर करून नेटकऱ्यांनी मीम्स शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या