Girl Dance Video Viral: सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते डान्सचे व्हिडीओ पाहायला मिळतात. या व्हिडीओमध्ये अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी थिरकताना दिसतात, आपली कला सादर करताना दिसतात. कोणी ट्रेंडिंग गाण्यावर नाचत असतं, तर कोणी लग्नाच्या वरातीत बेंजोवर थिरकत असतं. या सगळ्यामध्ये अनेकदा असे काही व्हिडीओ असतात जे मनात घर करून बसतात.

लहान मुलं, देवाघरची फुलं असं म्हटलं जातं. कारण ही चिमुकली मंडळी जे काही करतात ते अगदी मनापासून करतात. त्यांच्या वागण्यात कधी लबाडी नसते ना स्वार्थीपणा. अगदी मनमोकळं आयुष्य जगायला त्यांना आवडतं. मग ते कसलीच चिंता करत नाहीत. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही चिमुकली बेंजोवर अगदी कशाचं भान न ठेवता तालात थिरकताना दिसतेय.

चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल (Girl Dance Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगी बेंजोवर अगदी जोशात डान्स करताना दिसतेय. उत्तम डान्स स्टेप करत ती बेंजोवर थिरकताना दिसतेय. तिचा हा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकून येतोय. कसलंच भान न राखत ती अगदी उत्तम नृत्य करताना या व्हिडीओमध्ये दिसतेय. या चिमुकलीचा डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी तिच्या या डान्सचं खूप कौतुकदेखील केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर “चिमुकलीच्या डान्सने सर्वांची मने जिंकली!”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.” दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

दोन चिमुकलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “अप्रतिम! खूप छान”. दुसऱ्याने, “काय नाचलीय राव ही”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “आतापर्यंतची सर्वांत सुंदर रील! खूप छान”, अशी कमेंट केली. तर नाद करायचा नाही, एक नंबर, लय भारी, जाम भारी अशा अनेक कमेंट्स युजर्सने या लहान मुलांसाठी केल्या आहेत.