Wedding bride dance video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांना देखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडिओंना खूप पसंती दिली जाते. आपलं लग्न झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतं. अशाच एका नवरा नवरीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर नवरा नवरी थिरकली आहे. या खानदेशी गाण्यावर नवरदेवाचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर khandeshyt_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी या व्हिडीओवर एकानं “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी पाहून नवरदेवही लाजला असेल”.