Viral Photo: हल्ली लोक सोशल मीडियाच्या दुनियेत रमलेले असतात. आपले कुटुंबीय, नातेवाईक यांच्याहून अधिक लोकांना सोशल मीडियाची जास्त ओढ लागलेली असते. त्यामुळेच सोशल मीडियामुळे माणसं दुरावली असं अनेकदा म्हटलं जातं. पण, सोशल मीडियावर चांगले वाईट असे अनेक विषय असतात. मात्र, त्यातून आपल्यासाठी काय योग्य आहे हे निवडणं खूप महत्वाचं आहे. सोशल मीडियावर असे अनेक विषय आहेत, ज्यातून आपण विविध गोष्टी शिकू शकतो. दरम्यान, त्यातूनही सतत विविध गोष्टी आपल्या नजरेस पडत असतात. ज्यावर अगदी आपले मनोरंजन व्हिडीओ, फोटो असतात तर कधी भयानक, थरकाप उडवणारे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. अशातच आता एक फोटो खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

तुम्ही आतापर्यंत लैला-मजनू, रोमियो-जूलियट यांच्या अजरामर प्रेमकथा ऐकल्या असतील. खरंच प्रेम ही एक गोड भावना आहे. जो व्यक्ती प्रेमात पडतो, तेव्हा तो प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो; काही प्रेमी आपल्या जोडीदारासाठी अगदी स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार असतात. प्रेमाचे असे अनेक किस्से आपण बऱ्याचदा ऐकले किंवा पाहिले असतील. आता व्हायरल झालेल्या या फोटोमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात मारून घ्याल.

Ashadhi Ekadashi 2024 at CSMT and churchgate station abhang bhajan kirtan performe by mumbaikars at train
VIDEO: लोकलच्या गर्दीतले पाय टाळ-मृदुंग ऐकून थांबले; मुंबईतही आषाढीचा उत्साह, सीएसएमटी स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा
Kalyan railway station, water,
पावसाचे पाणी उपसण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक भागात पाणी उपशाचे तीन पंप
Video of stray dog
मुंबईच्या स्टोअरमध्ये पावसापासून वाचण्यासाठी भटक्या कुत्र्याने घेतला आसरा, हृदयस्पर्शी Video पाहताच रतन टाटांचे होतेय कौतुक
Woman attacked, knife,
विरार रेल्वे स्थानकात थरार, रेल्वे पूलावर महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला
cctv camera, Thane station,
ठाणे स्थानकातील ३४ कॅमेरे बंद, निगराणी नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Girl molested on road incident happen in Vasai railway station area
भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग, वसई रेल्वे स्थानक परिसरातील घटना
The couple did this to get a free meal at an expensive restaurant netizens
हद्द झाली राव! महागड्या रेस्टॉरंटमध्ये फुकट जेवण मिळवण्यासाठी जोडप्याने केले हे कृत्य, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
The young man showed cleverness to escape from the stray dogs
याला म्हणतात डोकं! भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तरुणानं लढवली शक्कल; VIDEO पाहून पोट धरून हसाल

हा व्हायरल फोटो दादर रेल्वेस्थानकावरील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण येथील एका प्लॅटफॉर्मवरील शौचालयावर चढून बसलेला दिसत आहे. शिवाय हा फक्त बसला नसून त्याने तिथे स्वतःचा फोन चार्जिंगदेखील लावला आहे. तसेच, यावेळी तो कोणाबरोबर तरी कॉलवर बोलताना दिसत आहे. या तरुणाची ही करामत पाहून अनेक जण तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कॉलवर बोलत असल्याचे म्हणत आहेत. हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने फोटोवर, “एवढी काय इमर्जन्सी असेल बरं”, असं गमतीमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा: “आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल

पाहा फोटो:

हा फोटो इन्स्टग्रामवरील @marathi.viral_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन हजारांहून अधिल लाइक्स मिळाल्या आहेत. तर अनेक जण या फोटोवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “तो त्याच्या बाबूशी बोलत असेल,” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मुलीची भानगड असेल भावा.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “बहुतेक ब्रेकअप होत असेल”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “त्याची गर्लफ्रेंड रुसली असेल.”