पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे आहे, असे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत तातडीच्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे त्याबाबत कॅबिनेट सचिवालयाने जी अधिसूचना जारी केली आहे त्यावरून राजनाथ सिंग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत परदेश दौऱ्यावर जाणार असून त्या कालावधीत तातडीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी ती राजनाथ सिंग यांच्यापुढे सादर करावीत, असे आदेश मोदी यांनी दिल्याचे कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
मोदी मंत्रिमंडळात गृहमंत्री दुसऱ्या क्रमांकावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे आहे, असे स्पष्ट झाले आहे

First published on: 27-09-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh no 2 in modi cabinet