दिवाळी हे आनंदाचे पर्व. घरात मांगल्य व भरभराट आणणारा उत्सव. प्रत्येकाचे अंगण दिव्याच्या प्रकाशाने उजळून काढणारा सण विद्युत रोषणाई कितीही आकर्षक केली तरीही मातीपासून बनविलेल्या पणत्यांची किंमत अद्याप कमी झालेली नाही. प्रत्येक घरी दिवाळीच्या दीपत्कार घडून येतो. या पणत्यांच्या माध्यमातून दिवाळीला घरोघरी रोषणाई साकारणारा कुंभार आजही उपेक्षितच आहे. शासकीय नियम दाखवून पर्यावरणाच्या नावाखाली कुंभाराची भट्टी हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इलेक्ट्रानिक युगात दीपोत्सव खुलविण्यासाठी अनेक साहित्य बाजारात आले होते तरी पारंपरिक पणत्यांना विशेष स्थान आहे. पणत्यांच्या माध्यमातून घरा-घरातील दीपज्योती साकारणारा वेडा कुंभार आजही उपेक्षेचे जीवन जगत आहे. मातीच्या ओल्या गोळांना आकार देणाऱ्या या समाजाला आपल्या जीवनात मात्र आकार देणे जमलेले नाही.
दिवाळीच्या सणाला घरासमोरील अंगणात, नक्षीदार रांगोळीवर तुळशीजवळ, घरातील देव्हाऱ्यांवर, घरासमोर ओळीने पणत्या ठेवण्यात येतात. पण आजही त्या बनविणाऱ्या कुंभाराला मोठे परिश्रम करावे लागतात, मात्र कुंभाराच्या व्यवसायाला अद्यापही व्यावसायिक दर्जा मिळालेला नाही. उलट, शासकीय नियम दाखवून पर्यावरणाच्या नावाखाली कुंभाराची भट्टी हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कुंभारांच्या  या परंपरागत व्यवसायासाठी सिमेंटच्या जंगलात माती मिळणे कठीण झाले आहेत.