तामिळनाडूमध्ये २९ जून रोजी रिधान्या नावाच्या नवविवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या नवरा आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत होता. २८ एप्रिलला लग्न झाल्यानंतर तिला ७० लाखांची कार आणि ८०० ग्रॅम सोनं दिलं होतं, तरीही आणखी हुंड्याची मागणी होत होती. पोलिसांनी तिच्या नवरा, सासरे आणि सासूला अटक केली आहे.