मुंबईतील मीरा रोड येथे मराठी न बोलल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हॉटेल मालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी बोललीच पाहिजे. मात्र, कायदा हातात घेऊ नका, तक्रार करा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.