राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.Read More
कारखानदारांच्या सोयीऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तंत्रत्रानाचा वापर व्हावा. साखर कारखाने काटा मारतात. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करण्यापेक्षा कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.