Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023: राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून स्टेनो टायपिस्ट, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी) या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवरांना या भरतीसाठी http://www.krishi.maharashtra.gov.in या बेवसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी विभाग महाराष्ट्र (Maharashtra Agriculture Department) ) भरती मंडळ, पुणे यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीनुसार एकूण ६० रिक्त पदांची घोषणा केली आहे. तर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे.

हेही वाचा- स्टेट बँकेत १०२२ पदांची बंपर भरती ! ३० एप्रिलपर्यंत भरू शकता अर्ज, महिन्याचा पगार आहे…

पदाचे नाव – लघुटंकलेखक,लघुलेखक, लघु लेखक

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता १० वी पास असून विविघ पदाच्या आवश्यकतेनुसार ती बदलण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग – ७२० रुपये.

आरक्षित प्रवर्ग – ६५० रुपये.

अर्ज करण्याती पद्धती – ऑनलाईन

हेही वाचा – तुम्हीही शोधताय सरकारी नोकरी? इस्रोमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२३

अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

नोकरीचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज –

  • उमेदवारांना सर्वप्रथम कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या बेवसाईटवर लॉगइन करावे लागेल.
  • ६ एप्रिल २०२३ पासून अर्ज करायला सुरुवात होईल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२३ असेल.
  • अर्जामध्ये अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • या भरतीसाठीची अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर करण्यात आलेली आहे.
  • अंतिम तारीखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया (https://drive.google.com/file/d/15uZZ29RE1oZwTKoT6czCAg9P8EDUaOqd/view) या लिंकवरील PDF जाहिरात वाचावी.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krushi vibhag maharashtra announces new recruitment to fullfill the vacancies for the posts steno typist stenographer jap
First published on: 05-04-2023 at 09:32 IST