08 July 2020

News Flash

करिअरचे टेक-ऑफ

विमानोड्डाण म्हणजेच ‘एव्हिएशन’ कार्यक्षेत्राला अतिप्राचीन परंपरा लाभली असल्याचे इतिहास सांगतो.

विमानोड्डाण म्हणजेच ‘एव्हिएशन’ कार्यक्षेत्राला अतिप्राचीन परंपरा लाभली असल्याचे इतिहास सांगतो. साधारण सोळाव्या शतकापर्यंत हवेपेक्षा वजनाला हलक्या घटकांचा, वायूंचा उपयोग करून विमानसदृश वस्तू बनवून हवेत उडवण्याचे प्रयत्न झाले, तर सतराव्या आणि अठराव्या शतकात हवेपेक्षा जड घटकांचा वापर करून विमान उड्डाणाचे प्रयोग झाले. सन १९०० ते १९०२ या कालावधीत राईट बंधूंनी पद्धतशीरपणे प्रयत्न करून विमाननिर्मिती साध्य केली, हे सर्वज्ञात आहेच. परंतु त्याही पूर्वी १८९५ साली मुंबईतील संस्कृत आणि वेदांचे गाढे अभ्यासक असलेल्या शिवकर बापुजी तळपदे यांनी मरुतसखा नावाचे मानवरहित विमान बनवून त्याचे हवेत काही मिनिटे यशस्वी उड्डाण करण्याचा प्रयोग घडवला होता.
भारतात नागरी विमान सेवा उद्योगाची सुरुवात मात्र १९१२ साली झाली आणि आज नागरी विमान उद्योगात जगातील आघाडीची बाजारपेठ म्हणून भारताची गणना केली जाते. इंडिया ब्रांड इक्विटी फौंडेशन (केंद्र सरकार उपक्रम) च्या माहितीनुसार २०२० सालापर्यंत  विमानउड्डाण सेवा उद्योगात जागतिक पातळीवर भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीचा विचार करता येत्या दशकभरात नागरी विमान सेवा उद्योगात नोकरीच्या आणि प्रगतीच्या संधींसाठी भरपूर वाव असेल हे स्पष्ट होते.
विविध  शिक्षणक्रम
१. अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन एव्हिएशन मॅनेजमेंट
पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर किमान ५० टक्क्यांनी उत्तीर्ण.
हा प्रशिक्षणक्रम चालवणाऱ्या शिक्षणसंस्था :
* बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सटिी, अहमदाबाद (www.baou.edu.in)
* गुरुनानकदेव युनिव्हर्सटिी, अमृतसर  (www.gndu.ac.in )
हे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना एअरक्राफ्ट मेंटेनन्स मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, व्हेंडर मॅनेजमेंट, एव्हिएशन ऑपरेशन स्पेशालिस्ट एअरक्राफ्ट इन्स्पेक्टर, एअरक्राफ्ट मेंटेनन्स सुपरव्हायजर, फ्लाइट स्टुवर्ड, कार्गो मॅनेजर, एअर टिकेटिंग प्रोफेशनल अशा संधी मिळू शकतात.

२. एमबीए एव्हिएशन मॅनेजमेंट
पात्रता : १०+२ उत्तीर्ण कोणत्याही शाखेतून, पदवी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण (गणित, अर्थशास्त्र, विषयांसह प्राधान्य) आणि एव्हिएशन उद्योगातील दोन वर्षांचा कामाचा अनुभव. अपटेक एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी येथून बीबीए एव्हिएशन ही पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी, या शिक्षणक्रमासाठी थेट प्रवेश घेऊ शकतात. एव्हिएशन उद्योगातील अनुभव, मेहनती, उत्तम संवादकौशल्य असल्यास प्राधान्य मिळते.
* इन्स्टिटय़ूट ऑफ लॉजिस्टिक्स, एव्हिएशन मॅनेजमेंट, अंधेरी, मुंबई.  (prist.ac.in)
* आय.आय.फ्लाय एव्हिएशन ट्रेिनग सेंटर, मुंबई.  (iifly.in)
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक.   (ycmou.digitaluniversity.ac)
* ग्लोबल एव्हिएशन अ‍ॅकॅडमी, मुंबई.   (www.globalaviationedu.com)
३. एम.एस.सी. एव्हिएशन
पात्रता- विद्यार्थ्यांला पदवी परीक्षेत ५० टक्के गुण प्राप्त हवे. काही विद्यापीठांतील प्रवेशासाठी विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक ठरते.
* आंध्र प्रदेश एव्हिएशन अ‍ॅकॅडेमी (apaviationacademy.in)
* सिद्धार्थ इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅरोनॉटिकल इंजिनीिरग इन्फोम्रेशन टेक्नोलॉजी  (www.siaeit.com)
* सिव्हिल एव्हिएशन ट्रेिनग कॉलेज, अलाहाबाद, हैद्राबाद  (www.aaians.org)
* इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अ‍ॅकॅडेमी  (www.igrua.gov.in)

५. बी.बी.ए. एव्हिएशन- बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन एव्हिएशन
पात्रता : १० + २ किंवा बारावी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण.
हे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना एव्हिएशन उद्योगात खालील क्षेत्रांत नोकरीच्या संधी मिळू शकतात-
क्रेडिट कंट्रोल, एव्हिएशन व्यवस्थापन, एअरलाइन इन्श्युरन्स, एअरलाइन कंत्राटदार, सेल्स ऑपरेशन्स, खातेवसुली (रिकव्हरी), प्रशिक्षण.

६. बी.बी.ए. (बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) इन एअरलाइन मॅनेजमेंट
याअंतर्गत नागरी हवाई वाहतूक सेवा उद्योगातील आíथक बाबींचे नियोजन, दर निश्चिती, वाहतूक मार्गाचे नियोजन हे विषय हाताळले जातात.
पात्रता : १०+२ कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (www.ycmou.digitaluniversity.ac )

बी.एस.सी. एव्हिएशन टेक्नोलॉजी आणि पायलट स्टडीज
याअंतर्गत विमान उड्डाण सेवेतील तांत्रिक प्रशिक्षणाचा समावेश होतो. विमानाचे उड्डाण कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि विमान विज्ञान या बाबींचा समावेश होतो.
या क्षेत्रातील शिक्षित व्यक्तींना विमान उड्डाण उद्योगातील विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी मिळू शकतात. उदा. एअरपोर्ट ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंट, एअर ट्रॅफिक कंट्रोल, विमान उड्डाण सूचना, विमान सेवा उद्योगातील टेक्निकल सेल्स आणि मार्केटिंग, प्रशिक्षण संस्था.

हे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना खालील नोकऱ्या शक्य होतात-
एव्हिएशन प्लानर आणि प्रोजेक्ट मॅनेजर, ग्राऊंड स्पीकर, टेक्निशियन – सीनिअर एव्हिएशन सपोर्ट, रिसर्च अ‍ॅनालिस्ट- एव्हिएशन, लीड एव्हिएशन डेटा अ‍ॅनलिस्ट.

बी.एस.सी एव्हिएशन
विमानतळ नियोजन, विमानतळ सुरक्षा, प्रवासी वाहतुकीचा अंदाज, आग प्रतिबंधक उपाययोजना या विषयांचा अभ्यास सादर शिक्षणक्रमात केला जातो. या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे आहेत :
* इंड्स युनिव्हर्सटिी, गुजरात  (www.indusuni.ac.in/about-us)
* मुंबई युनिव्हर्सटिी (mu.ac.in/portal)
हे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना खालील प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होतात :
एअर होस्टेस, टिकेटिंग मॅनेजर, कस्टमर केअर ऑफिशिअल, ड्रायव्हर डिस्पॅच लोड प्लानर.

करिअर संधी
एअरपोर्ट मनेजमेंट
विमानतळावरील कामकाजाचे नियोजन, प्रवाशांच्या वाहतुकीचे नियोजन, विमानतळाचे सर्वप्रकारे सुरक्षा नियोजन, ग्राऊंड स्टाफच्या कामाचे नियोजन या सर्व बाबींचे प्रशिक्षण या अंतर्गत
दिले जाते.
* बी.बी.ए – (बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) एअरपोर्ट मनेजमेंट
* एम.बी.ए. (मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) एअरपोर्ट मनेजमेंट.
प्रशिक्षण संस्था :
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ  (www.ycmou.digitaluniversity.ac)
* इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ  (www.ignou.ac.in )
* फ्रँकलीन इन्स्टिटय़ूट, दिल्ली  (www.frankfinn.com)
विमान उड्डाण उद्योगात नोकरी किंवा करिअर संधी दोन स्तरांवर उपलब्ध असलेल्या दिसतात-
प्रत्यक्ष विमान उड्डाण किंवा विमान कर्मचारी,  विमानतळावरील कर्मचारी.

२. एअर होस्टेस
काही प्रमुख शिक्षणसंस्था –
* एअर होस्टेस अ‍ॅकॅडेमी (ए.एच.ए), बंगळुरू, चंदिगढ, दिल्ली, मुंबई, पुणे. (www.airhostessacademy.com ) – एव्हिएशन अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट डिप्लोमा
* फ्रँकलीन इन्स्टिटय़ूट ऑफ एअरहोस्टेस ट्रेिनग, मुंबई  (www.frankfinn.com) – एअरहोस्टेस ग्राऊंड सíव्हसेस, एव्हिएशन अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी सíव्हसेस सर्टििफकेट कोर्स.
* राजीव गांधी कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स, जयपूर (www.rgmca.co.in) – बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअिरग.
* युनिव्हर्सल एव्हिएशन अ‍ॅकॅडेमी, चेन्नई (www.uniaviation.com) – सर्टििफकेट इन एअर होस्टेस, फ्लाइट स्टुवर्ड, हॉस्पिटॅलिटी मनेजमेंट सर्टििफकेट कोर्स.
* बॉम्बे फ्लाइंग क्लब, मुंबई विद्यापीठाशी संलग्न. (www.thebombayflyingclub.com) – व्यावसायिक वैमानिक (कमíशयल पायलट) या प्रकारचे प्रशिक्षण घेणारी व्यक्ती वयाने किमान १८ वर्षांची असणे गरजेचे आहे. पात्रता – १०+२   उत्तीर्ण, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने प्रमाणित केलेल्या डॉक्टरांकडून वैद्यकीय पात्रतेचे प्रमाणपत्रही आवश्यक असते. तसेच DGCA च्या नियमांनुसार विशिष्ट अवधीचा विमान चालवण्याचा अनुभव प्रशिक्षणानंतर पूर्ण करणे आवश्यक ठरते. बाकी अटी  DGCA च्या नियमानुसार. यासंबंधित अधिक माहिती www.dgca.nic.in या वेबसाइटवर मिळू शकते.
याव्यतिरिक्त गव्हर्नमेंट एव्हिएशन ट्रेिनग इन्स्टिटय़ूट  (www.flywithgati.com), इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स.
(www.igiaindia.in) या संस्थांमधूनही वैमानिक प्रशिक्षण घेतले जाते.

फ्लाइट इंजिनीअर
यासंबंधित प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती सर्व प्रकारच्या विमानांच्या कार्यपद्धतीची आणि कार्यान्वित राहण्याची जबाबदारी घेतात. उदा. इंजिनची स्थिती, इंधनसाठा, विमानाच्या आतील हवेचा दाब, वीज यंत्रणा, विमान उडण्यापूर्वी आणि विमान जमिनीवर उतरल्यानंतरचे व्यवस्थापन.
पात्रता: या व्यक्ती मेकॅनिकल, एरोनॉटिकल, इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगमधील पदवी आवश्यक, विमान यंत्रणेतील किंवा विमानाच्या आतील बिघाड सुधारण्याचे ज्ञान अवगत असण्याची गरज असते.
प्रशिक्षण संस्था :
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू. (www.iisc.ernet.in)
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ  एरोनॉटिकल इंजिनीअिरग. (iiaedehradun.org)
* मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी. (www.mitindia.edu)
* आय.आय.टी, मुंबई.     (www.iitb.ac.in)

फ्लाइट इन्स्ट्रक्टर
या व्यक्ती प्रत्यक्ष विमान उड्डाणासाठीचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. यात प्रत्यक्ष विमान उडवण्याचे प्रशिक्षण देणेही अंतर्भूत असते. यासाठी उमेदवार १८ वष्रे पूर्ण आणि या विषयातील प्रमाणपत्रधारक असणे आवश्यक आहे.
खालील संस्थांतून यासंबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात-
१. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फ्लाईंग स्टाफ, अहमदाबाद.
२. अ‍ॅम्बिशन्स एव्हिएशन अ‍ॅकॅडेमी, मुंबई. (www.flyambitions.com)

फ्लाइट स्टुवर्ड  
या व्यक्ती प्रत्यक्ष विमानात कार्यरत असतात. प्रवास सोयीचा होण्यासाठी ते प्रवाशांना सर्वतोपरी मदत करतात.
यासाठी आवश्यक प्रमाणपत्र किंवा पदविका शिक्षणक्रम वरीलपकी प्रमुख शिक्षणसंस्थांतून चालवले जातात. ( एअर होस्टेस प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवल्या जाणाऱ्या संस्था)

फ्लाइट पर्सर
विमानातील सर्व प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी जबाबदार असतात यासाठीचे शिक्षणक्रम एअर होस्टेस प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले जातात अशा शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहेत.

विमानतळावर कार्यरत असणारा ‘ग्राऊंड स्टाफ’
प्रवाशांचे सामान विमानापर्यंत हलवणे, सुरक्षा प्रक्रिया पार पाडताना प्रवाशांच्या सामानाची चढ-उतार, विमानतळावर स्वच्छता, सुरक्षेसंदर्भातील आक्षेपार्ह बाबी वरिष्ठ व्यक्तींपर्यंत पोहोचवणे, विमानाची बाहेरून-आतून स्वच्छता, ही सर्व कामे ग्राऊंड स्टाफकडून पार पाडली जातात.
१ एअरपोर्ट ग्राऊंड मॅनेजमेंट डिप्लोमा – चार ते सहा महिने. पात्रता १०+२ उत्तीर्ण.
प्रशिक्षण संस्था- इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स www.igiaindia.in
भारतातील नागरी विमान सेवा उद्योगात आजमितीस अनेक परदेशी विमान कंपन्यांचा समावेश आहेच. आगामी काळात सरकारच्या परकीय गुंतवणुकीसंदर्भातली अनुकूल धोरणे लक्षात घेता हा सहभाग वाढण्याची शक्यता प्रकर्षांने जाणवते. रोजगाराच्या विविधांगी आणि भरपूर संधी निर्माण करणाऱ्या नागरी विमान सेवा उद्योगाकडे वळण्याचा नक्कीच विचार व्हायला हवा.
गीता सोनी
geetazsoni@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2015 1:05 am

Web Title: career in aviation
Next Stories
1 लघु व मध्यम उद्योग मंत्रालयात असिस्टंट डायरेक्टर- केमिकल: ५ जागा
2 भारताचे स्वातंत्र्योत्तर दृढीकरण
3 मुलाखतीसाठीचा योग्य पेहराव
Just Now!
X