Modi Government News Updates : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये चांगलाचा तणाव निर्माण झाला आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून घेतले जाणारे निर्णय आणि त्याचे होणारे परिणाम यासंबंधीच्या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
India Pakistan War Tensions Live Updates 3 May 2025 : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेला भारत-पाकिस्तान तणाव तसेच इतर राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर...
CRPF Jawan: "राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक"; पाकिस्तानी महिलेबरोबरचा विवाह लपवणारा CRPF जवान बडतर्फ
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्यांदाच घेतली पंतप्रधान मोदींची भेट
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अब्दुल्ला आणि पंतप्रधानांमधील ही पहिली भेट होती.
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा चेन्नईहून श्रीलंकेला प्रवास? कोलंबोमध्ये विमानाची झडती
पाकिस्तानी झेंडा असलेल्या जहाजांना भारताच्या बंदरात प्रवेश बंदी; केंद्र सरकारचा निर्णय
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यादरम्यान पाकिस्तानाशी व्यापार देखील बंद करण्यात आला आहे. यानंतर आता पाकिस्तानचा ध्वज असलेल्या जहाजांना कोणत्याही भारतीय बंदरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरात जाण्याची परवानगी नसेल, अशी महिती बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिली आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला पहलगाम हल्ल्यातील पीडित सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या घरी भेट दिली. यावेळी बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, "...घाबरू नका, ज्यांनी कोणी हे केलंय, यामागे जे लोक आहेत त्यांनी मानवतेची हत्या केली आहे आणि त्यांच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडे आहेत. ते स्वर्गात जाऊच शकत नाहीत".
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर घातली बंदी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पाकिस्तानातून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर घातली बंदी
पाकिस्तानमध्ये येणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर भारताकडून बंदी घालण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Pahalgam Attack : 'मला सुसाईड बॉम्ब द्या, मी पाकिस्तानात जाईन अन्…', पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मंत्र्याचं विधान चर्चेत
जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. या निदर्शनाचा व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे.
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मू आणि काश्मीरमधील अनेक ठिकाणी सीमेवर गोळीबार
२-३ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार केला. ज्याला भारतीय सैन्याने तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.