उत्तर प्रदेशमधील दहशतवादी विरोधी पथकाने पीएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या एका गुप्तहेराला मेरठमधून अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे या गुप्तहेराने रशियाची राजधानी मॉस्कोमधील भारतीय दूतावासात काम केले होते. अटक करण्यात आलेला सत्येंद्र सिवल हा २०२१ पासून भारतीय दूतावासात कार्यरत होता. भारतातील सुरक्षा रक्षक (India Based Security Assistant) या पदावर तो तिथे कार्यरत होता.

दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, त्यांना मिळालेल्या गुप्तवार्ता माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. मॉस्कोमधील दूतावासात एक गुप्तहेर हेरगिरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने सत्येंद्र सिवलची चौकशी केली. या चौकशीत तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही आणि त्यानंतर त्याने हेरगिरी केल्याचे कबूल करताच त्याला अटक करण्यात आले.

israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

उत्तर प्रदेश एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे गुप्तचर त्यांच्या हस्तकांमार्फत भारतीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष देऊन भारतीय लष्कर आणि गुप्त धोरणांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी गुप्तवार्ता खात्रीलायक सूत्राकडून मिळाली. या माहितीच्या आधारे एटीएसने तपास सुरू केला. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स करून आणि पुरावे गोळा केल्यानंतर सत्येंद्र सिवलचा माग काढण्यात आला. सिवल हा उत्तर प्रदेशच्या हपूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो परराष्ट्र मंत्रालयातील बहुउद्देशिय कर्मचारी विभागात काम करतो.

एटीएसने पुढे म्हटले की, सत्येंद्र सिवल हा पाकिस्तानी हस्तकांच्या मार्फत भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळले आहे. त्याने पैशांच्या बदल्यात भारतीय लष्कर आणि गुप्त धोरणांची माहिती आयएसआयच्या हस्तकांना पुरविली. सिवलची चौकशी करण्यासाठी त्याला मेरठच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या कार्यालयात बोलाविण्यात आले होते. तिथे त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा मान्य केला.