Maharashtra Breaking News Live 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. उद्या (७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून या मतदारसंघांमध्ये काल (रविवार, ५ मे) सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, अजूनही चार टप्प्यांमधील मतदान बाकी असल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या उर्वरित मतदारसंघांकडे लक्ष वळवलं आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जलना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये येत्या १४ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी या मतदारसंघांकडे मोर्चा वळवला आहे. आजपासून या मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू झाला आहे. या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे आपलं या मतदारसंघांसह राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांवर लक्ष असेल.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
What Modi Said About Uddhav Thackeray ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Live Updates

Marathi News Live Today, 06 May 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या.

18:56 (IST) 6 May 2024
नागपूर : शिक्षणापासून वंचित १८० बालकांसाठी उघडणार शाळेची दारे

नागपूर : जिल्हयातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या १८० बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

18:36 (IST) 6 May 2024
निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले, धरण विरोधी संघर्ष समिती आक्रमक

यवतमाळ : निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ व मराठवाडा यांचा प्रकल्पाला असलेला टोकाचा विरोध दुर्लक्षित करून पाटबंधारे विभागाने नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील खंबाळा येथे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम व खडका ते खंबाळा नदीपात्रातून जोडणाऱ्या कच्च्या रपटयाचे काम शुक्रवारी ३ मे रोजी सुरू केले.

वाचा सविस्तर...

18:35 (IST) 6 May 2024
अमरावती : पंजाबमधील भीषण अपघातात चिखलदरा तालुक्‍यातील चारजण ठार

अमरावती : वैष्णोदेवीचे दर्शन करून पंजाबमधील जालंधर येथे मुलाकडे जाणाऱ्या चिखलदरा तालुक्‍यातील सोलामूह येथील बेलसरे कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. सोमवारी (६ मे रोजी) पहाटे ३:३० वाजता हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

वाचा सविस्तर...

18:28 (IST) 6 May 2024
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सज्जता; पथके रवाना

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवारी मतदान होणार असून त्यासाठीची शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन, मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्री मतदान चमूंना वितरीत करण्यात आली असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत. राजकीय पक्षांनी केंद्रावर आवश्यक ती साधनसामग्रीची जुळवाजुळव केली आहे. कोल्हापूर मतदारसंघात १९ लाख ३६ हजार मतदार आसून त्यासाठी २ हजार १५६ मतदान केंद्र असणार आहेत. हातकणंगलेत १८ लाख २४ हजार मतदार असून त्यासाठी १ हजार ८३० मतदान केंद्र असणार आहेत.

18:20 (IST) 6 May 2024
सोलापूर : वाढत्या तापमानात मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान; भाजपच्या प्रतिष्ठेची, तर काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई

सोलापूर : सोलापूर आणि माढा दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई होत असून त्यासाठी उद्या मंगळवारी दोन्ही जागांवर मिळून ४० लाख २१ हजार ५७३ मतदार उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद करणार आहेत.

सविस्तर वाचा....

18:04 (IST) 6 May 2024
“खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची; उद्धव ठाकरेंना राहुल गांधी समोर मुजरा…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे ती नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात. त्यांच्या विचारांचे नाही. देशाला मजबूत नेतृत्व हवं आहे. उद्धव ठाकरे यांना विचारणार कोण? त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचा आहे. या व्यतिरिक्त कुठलीही भूमिका त्यांना यापुढे मिळणार नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

सविस्तर वाचा...

17:52 (IST) 6 May 2024
ग्रीन कॉरिडॉरमुळे दोघांना जीवदान! नाशिकमधून केवळ अडीच तासांत फुफ्फुस अन् मूत्रपिंड पुण्यात

नाशिकमधील एका रुग्णालयातील मेंदूमृत रुग्णाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे अवयवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दोन रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

सविस्तर वाचा...

17:50 (IST) 6 May 2024
गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पंकजा यांनी बंद पाडला; माजी मंत्री सुरेश नवलेंचा आरोप

बीड लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार दौऱ्यावर असताना माजी मंत्री सुरेश नवले यांनी बीडच्या गेवराई येथे पत्रकार परिषद घेत भाजपाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टिका केली आहे. पंकजा मुंडे यांची ध्वनीफित सध्या सोशल मिडियावर फिरत आहे त्यामधुन पंकजा मुंडे या जातीवाद करत असून मराठ्यांसह सह बहुजन समाजाच्या विरूद्ध बोलताना दिसत आहेत. बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एका साखर कारखान्याचे दोन साखर कारखाने तयार करुन बीडमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देत दिलासा दिला आहे. तर गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पंकजा मुंडे यांनी बंद पाडला आहे.,अशा शब्दांत माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

17:45 (IST) 6 May 2024
प्रवाशांना खुणावताहेत रेल्वेचे ‘व्हिस्टाडोम’! वर्षभरात पावणेदोन लाख जणांचा प्रवास; २६ कोटी रुपयांचे उत्पन्न

मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते लोकप्रिय ठरत आहेत.

सविस्तर वाचा...

17:37 (IST) 6 May 2024
भारतीय खगोलशास्त्रज्ञांची महत्त्वाची कामगिरी… शोधला २० लाख प्रकाश वर्षे अंतरात पसरलेला दुर्मीळ रेडिओ स्रोत

एबल २१०८ या दीर्घिका समूहात २० लाख प्रकाशवर्षे अंतरात पसरलेल्या दूर्मीळ रेडिओ स्रोताचा शोध घेण्यात भारतीय खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे.

सविस्तर वाचा...

17:34 (IST) 6 May 2024
वीज देयकांत पैसे वाचवायचे असतील तर ‘ही’ आहे योजना…

नागपूर : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात महावितरणच्या गो ग्रीन योजनेत सहभाग घेणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील १७ हजार ३७२ ग्राहक वर्षाला वीज देयकात तब्बल १२० रुपये वाचवत आहे.

वाचा सविस्तर...

16:58 (IST) 6 May 2024
नवी मुंबईतून ७५० पोलिसांची कुमक रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी तैनात

पनवेल : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील सुरक्षा व्यवस्थेसाठी नवी मुंबई पोलीस दलाचे साडेसातशे पोलीस कर्मचारी व अधिकारी रत्नागिरीला रवाना झाले आहेत. मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी ही अतिरीक्त पोलिसांची कुमक रत्नागिरी येथे तैनात करण्यात आली आहे.

16:33 (IST) 6 May 2024
पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर… उच्च न्यायालयाचा थेट राज्य शासनाला…

नागपूर : राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमधील सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत निर्णय कधी घेणार, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला विचारला आहे. राज्य शासनाला यावर १२ जूनपर्यंत जबाब नोंदविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

वाचा सविस्तर...

15:59 (IST) 6 May 2024
समृध्दी महामार्गावर ३२ लाखाचा गांजा जप्त

नाशिक - सिन्नर तालुक्यातील वावी हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर खंबाळे शिवारात रविवारी रात्री वाहतूक नियंत्रण पथकाकडून ३२ लाखांहून अधिक रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15:57 (IST) 6 May 2024
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नवी मुंबई : पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध असावेत अशा गैरसमजापोटी पत्नीच्या डोक्यात जड वस्तूचा घाव घालून तिला ठार केल्याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार घडल्यावर पती फरार झाला होता मात्र त्याला शोधून रविवारी रात्री अटक करण्यात आले आहे. 

वाचा सविस्तर...

15:23 (IST) 6 May 2024
‘समृद्धी’वर चालकाला डुलकी लागली अन दोघांचा गेला जीव, चौघे गंभीर…

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर आज सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन प्रवासी ठार तर चौघे गंभीर जखमी झाले.

वाचा सविस्तर...

15:22 (IST) 6 May 2024
मुख्यमंत्र्यांचे आनंद दिघेंबाबत मोठे वक्तव्य, “रुग्णालयात असताना पद सोडायला सांगितल्याने दिघे बैचेन होते…”

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची लोकप्रियता सलत होती. यामुळेच त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता आणि रुग्णालयात असताना त्यांना तसा निरोपही आला होता. यामुळे दिघे बैचेन होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

वाचा सविस्तर...

14:52 (IST) 6 May 2024
जे. पी. गावित यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार

जे. पी. गावित यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. ते म्हणाले, पक्षाच्या आदेशाचे पालन करून मी माघार घेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी काम करेन. आदिवासी लोकांसाठी तुतारी चिन्ह नवीन असल्याने हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन,

13:54 (IST) 6 May 2024
गडचिरोली: नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला, पुरून ठेवलेली स्फोटके नष्ट

विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली.

सविस्तर वाचा...

13:41 (IST) 6 May 2024
पनवेल: आधी नुकसान भरपाई, नंतर घरांचा ताबा; तळोजातील सिडकोच्या लाभार्थींची आर्जवी

चालण्यासाठी रस्ते, पथदिवे आणि मलनिसारण वाहिनीची कामे पुर्ण करा, त्यानंतरच सदनिकांचा ताबा द्या, अशी भूमिका या लाभार्थ्यांनी घेतली आहे.

सविस्तर वाचा...

13:27 (IST) 6 May 2024
"RSS आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष चालू होता", संजय राऊतांचं वक्तव्य, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांचा उल्लेख करत म्हणाले...

आरएसएस आणि करकरे यांच्यात संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर चर्चा झाल्या. एटीएसने त्यावेळी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. रमेश उपाध्याय यांनाही अटक केली होती. त्या केसचा अभ्यास मी केला आहे. त्यावेळी आरएसएसचे लोक माझ्याकडे यायचे, करकरेंनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे असं सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबीय माझ्याकडे यायचे. आरएएस आणि करकरेंचा संघर्ष सुरु होता. दुसरी गोष्ट की विजय वडेट्टीवार यांचं नाव का घेता? हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा, ते हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारायचा असेल तर मुश्रीफ यांना विचारा. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके होते. त्यांना अटक झाल्याने संघ आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष सुरु होता. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

13:04 (IST) 6 May 2024
आठवड्याभरात सोने १ हजार तर चांदीच्या दरात ८०० रुपयांनी घसरण; जाणून घ्या आजचे दर…

नागपूरसह देशभरात मध्यंतरी झपाट्याने वाढलेले सोने आणि चांदीच्या किमती आता खाली घसरत आहेत.

सविस्तर वाचा...

12:46 (IST) 6 May 2024
कल्याणमधील चिंचपा़डा, व्दारली येथील हरितपट्ट्यावरील जीन्सचे ३२ कारखाने जमीनदोस्त, प्रदुषणाने परिसरातील नागरिक होते त्रस्त

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, व्दारली भागातील हरितपट्टा नष्ट करून उभारलेले प्रदुषणकारी जीन्सचे ३२ कारखाने आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांंनी अतिक्रमण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने शनिवारी भुईसपाट केले.

वाचा सविस्तर...

12:27 (IST) 6 May 2024
बँड बाजा बारात! मात्र, वाजंत्रीचीच निघाली वरात अन् थेट पोलिसांच्या दारात

वर्धा : लग्नाचा हंगाम असल्याने जिकडे तिकडे बँडचा आवाज निनादत आहे. त्यातच नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या उत्साहास उधाण आले आहे. वाजंत्री बहू गलबला नं करणे, म्हटले रे म्हटले की धूमधडाका सूरू. मात्र एका लग्न प्रसंगत आगळीक घडली. हिंगणघाट लगत सावरगाव येथील ही घटना आहे. नागपूर जिल्ह्यातील माळापूर येथील मातंग समाजाचे संजय अभिमन्यू ठोसर यांच्यासह बँड पथकातील तिघांना नरखेड येथील लग्न सोहळ्यात जबर मारहाण झाली.

तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार लहुजी सेनेने हिंगणघाट पोलिसांकडे केली. नाहक वाद करीत हा मारण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नव्हे तर लग्न सोहळ्यात वाजंत्री वाजविण्याचे ठरलेले पैसे पण मिळाले नाही. शिवाय जातीवाचक शिवीगाळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची चौकशी करुन सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

12:25 (IST) 6 May 2024
दुर्दैवी! चालू कुलरला स्पर्श झाला अन् होत्याचे नव्हते झाले; विजेचा धक्का लागल्याने…

कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळी घडली.

सविस्तर वाचा...

12:20 (IST) 6 May 2024
पुणे शहराचा खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचं भव्य स्मारक उभारणार : ‘एमआयएम’चे उमेदवार अनिस सुंडके

देशभरात विविध महान व्यक्तींची स्मारकं आहेत. या स्मारकाच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रत्येक स्मारक प्रेरणा देत आले आहेत. त्यामुळे मी पुण्याचा खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचं कार्य लक्षात घेऊन मी भव्य असे स्मारक उभारणार. - 'एमआयएम'चे उमेदवार अनिस सुंडके

वाचा सविस्तर....

12:19 (IST) 6 May 2024
रेल्वे पुलाच्या कामासाठी डोंबिवली फलाट एकवरील आरक्षण केंद्र कल्याण बाजुला

डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाच क्रमांकाच्या मध्ये एक पादचारी पूल उभारण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. या पुलाच्या कामाला फलाट क्रमांक एक वर असलेले आरक्षण केंद्र बाधित होत आहे.

वाचा सविस्तर....

12:07 (IST) 6 May 2024
नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावापुढील पदपथ झाले वाहनतळ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष, वाहनकोंडीने नागरिक त्रस्त

विशेष करून उच्चभ्रू वस्तीतून येणारे प्रशिक्षणार्थी किंवा पोहणारे कारने येतात. मात्र, या परिसरात कार पार्किंग नसल्यामुळे मोठी अडचण होत आहे.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 6 May 2024
शरद पवार करणार पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांना मतदान…जाणून घ्या कारण

शरद पवारांनी लोकसभा निवडणूकीमध्ये २२ दिवसांत ५२ सभा घेतल्या आहेत. काल बारामती मध्ये सांगता सभेमध्ये त्यांना थकवा जाणवत होता.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 6 May 2024
उद्योजक बिर्लांसह आठ जणांना नोटीस, अकोला ऑईल इंडस्ट्रिजच्या जमीन घोटाळ्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

अकोला ऑईल कंपनी अवसायनात गेल्यानंतर कारखान्याचा परिसर ४८ एकर २० गुंठे जागा खासगी असल्याचा कुठेही उल्लेख नाही.

सविस्तर वाचा...

prithviraj chavan

“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. या प्रचारकाळात महाविकास आघाडी व महायुती या राज्यातील दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी, टोलेबाजी, कोपरखळ्या, टोमणे असं सगळं मतदारांना पाहायला मिळालं. मात्र, एकीकडे मतदानाच्या आधीच्या या घडामोडी घडत असताना दुसरीकडे निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष दिसणार नाहीत, असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी मतदान झालं असून ७ मे, १३ मे आणि २० मे या तीन दिवशी अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. ४ जून रोजी देशभरातील सर्व जागांची मतमोजणी होईल. मात्र, त्यानंतर दोन पक्ष लोप पावतील, असं चव्हाण यांनी म्हटल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. हे दोन पक्ष नेमके कोणते? याबाबत त्यांनी भाष्य केलं नसलं, तरी त्यावरून अंदाज बांधले जात आहेत.