बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे ‘ओनोमेटोमॅनिया’ या आजाराने ग्रस्त असून या आजाराबद्दल त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या आजाराबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की ते ‘ओनोमेटोमॅनिया’ या आजाराचा सामना करत आहेत. या आजारामुळे ते शांतपणे जगूही शकत नाहीत आहेत.

काय आहे ‘ओनोमेटोमॅनिया’?

नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले की ‘ओनोमेटोमॅनिया’ एक असा आजार आहे, ज्यामध्ये लोक एकदा बोललेल्या गोष्टी सतत बोलत राहतात. यामध्ये तुम्ही कोणतेही कारण नसताना एखादा शब्द, वाक्प्रचार, वाक्य, कविता किंवा भाषण पुन्हा पुन्हा सांगत राहता. ते म्हणतात, ‘माझ्यासोबत हे प्रत्येक क्षणी घडते, त्यामुळे मी कधीही शांततेत जगू शकत नाही. मी झोपेत असतानाही मला आवडणारे काही उतारे बडबडत राहतो.’

डॉक्टर या आजाराबाबत काय सांगतात?

ओनोमेटोनिया हा एक आजार आहे ज्यामध्ये लोक त्यांचे आवडते शब्द पुन्हा पुन्हा बोलतात. डॉक्टरांच्या मते, ‘ऑनोमॅटोमॅनिया’ ही अशी स्थिती आहे जिथे एखादी व्यक्ती विशिष्ट शब्द, वाक्प्रचार किंवा एखाद्या मुद्द्याबद्दल विचार करत राहते आणि संभाषणात त्याचा वारंवार वापर करते.

तज्ञांच्या मते, ओनोमेटोमॅनिया हा एक आजार किंवा मानसिक स्थिती नाही. तथापि, ही परिस्थिती काही लोकांना त्रास देऊ शकते. या समस्येमुळे त्यांच्या अनेक कृतींवर परिणाम होत असल्यास, ही एक वैद्यकीय स्थिती असू शकते.

Story img Loader