कोल्हापूर : अर्थविषयक बाजारातील स्पर्धात्मकता वाढत चालली असताना सहकारी संस्थांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारतानाच उत्पन्नाचे नवनवे स्त्रोत वाढवून सक्षम होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. राजकारणाच्या विळख्यात अडकलेला सहकार कायदा हा अधिक सुटसुटीत, समृद्ध झाला पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य पातळीवरून अनुरूप बदल करण्यात यावा, असे मत भारतीय रिझर्व बँकेचे संचालक, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

सहकार भारतीच्या कोल्हापूर विभागातील सदस्यांचे दोन दिवशीय अभ्यास वर्ग श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना मराठे बोलत होते. अभ्यास वर्गाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह भगतराम छाबडा, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहकार भारतीचे राज्य महामंत्री विवेक जुगादे, प्रा. शरद जाधव, सांगली जिल्हा अध्यक्ष संजय परमने, सहकार भारतीच्या महिला राज्याध्यक्ष वैशाली आवाडे, श्रीकांत पटवर्धन, औदुंबर नाईक, तसेच प्रवीण बुलाख, जवाहर छाबडा, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अरविंद मजलेकर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था प्रकोष्ट सागर चौगुले, कोल्हापूर विभाग प्रमुख चंद्रकांत धुलप, जिल्हा संघटक सागर हुपरे आदींनी मार्गदर्शन केले. गटचर्चा व सांस्कृतिक कार्यक्रमात सदस्यांनी सहभाग नोंदवला. महामंत्री श्रीकांत चौगुले यांनी आभार, जिल्हा सहसंघटक संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांतील सहकार भारतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.