24 October 2019

News Flash

हरभजन सिंगने युवराज सिंगचे फोडले ‘हे’ गुपित…

ड्रेसिंग रूमपासून ते मैदानापर्यंत आणि खाणाच्या सवयीपासून ते एका विशिष्ट सवयीपर्यंत युवराजचे सगळे गुण-अवगुण हरभजन सिंगला माहित आहेत.

हरभजन सिंग आणि युवराज सिंग या दोन क्रिकेटपटूंच्या मैत्रीचे अनेक किस्से चाहत्यांनी ऐकले आहेत. ड्रेसिंग रूमपासून ते मैदानापर्यंत आणि खाणाच्या सवयीपासून ते एका विशिष्ट सवयीपर्यंत युवराजचे सगळे गुण-अवगुण हे हरभजन सिंग आणि इतर खेळाडूंना माहित आहे. युवराजच्या अशाच एका विशिष्ट सवयीबद्दल हरभजन सिंगने एका मुलाखतीत सांगितले आहे.

एका मुलाखतीत हरभजन सिंग हा मुलाखतकाराच्या भूमिकेत होता आणि चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना याची हरभजन मुलाखत घेत होता. या मुलाखतीत रॅपिड फायर राऊंड सुरु झाला. हरभजनने विचारलेल्या प्रश्नाचे रैनाने थोडक्यात आणि पटकन उत्तर देणे, हा त्या राऊंडचा नियम होता. या राउंडमध्ये हरभजनने रैनाला भारताच्या किंवा चेन्नईच्या टीममध्ये सगळ्यात जास्त पादण्याची सवय कोणाला आहे? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच रैना थोडा थांबला आणि त्याने उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला.

खरंतर, हरभजन सिंग त्या मुलाखतीचे सूत्रसंचालन करत होता. पण रैना उत्तर देत नाही हे पाहिल्यावर हरभजनने स्वतःहूनच या प्रश्नाचे उत्तर युवराज सिंग असे दिले. त्या उत्तरावर रैनाने हसत हसत होकारार्थी मान डोलावली. मात्र हरभजन एवढ्यावरच थांबला नाही. तर पुढे हरभजन असेही म्हणाला की युवराजला त्या सवयीत कोणीही हरवू शकत नाही.

या प्रश्नाआधी सर्वात खादाड खेळाडू कोण? असा प्रश्नही हरभजनने रैनाला विचारला होता. त्यावर रैनाने युवराज सिंगचे नाव घेतले होते.

First Published on May 9, 2018 6:55 pm

Web Title: harbhajan singh talks about yuvraj singhs farting