05 March 2021

News Flash

Ind vs NZ : कसोटी कारकिर्दीत मयांक अग्रवालवर पहिल्यांदाच ओढवली नामुष्की

भारतीय फलंदाजांचा निराशाजनक खेळ

न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली आहे. वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत चांगलं पुनरागमन करेल असा सर्वांना अंदाज होता. मात्र न्यूझीलंडमधील खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. मयांक अग्रवाल – पृथ्वी शॉ या जोडीलाही या मालिकेत फारशी आश्वासक कामगिरी करता आली नाही.

अवश्य वाचा – Ind vs NZ : अजिंक्यची ही आतापर्यंत सर्वात खराब खेळी – हरभजन सिंह

मयांकने वेलिंग्टन कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावत आपली चुणूक दाखवून दिली होती. मात्र ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात मयांकवर एक नामुष्की ओढावली आहे. पहिल्या डावात मयांक ७ तर दुसऱ्या डावात अवघ्या ३ धावा काढून माघारी परतला. आपल्या कसोटी कारकिर्दीत दोन्ही डावांमध्ये एकेरी धावसंख्येवर बाद होण्याची मयांकची ही पहिलीच वेळ ठरली.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कोणालाही दोष द्यायचा नाही; फलंदाजांच्या खराब कामगिरीवर बुमराहचं मत

ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावात ७ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर भारताकडे मोठी आघाडी घेण्याची चांगली संधी होती. मात्र ट्रेंट बोल्ट-टीम साऊदी यांच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज झटपट माघारी परतले. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली यांसारखे आघाडीच्या फळीतले फलंदाजही अगदी स्वस्तात माघारी परतले. काही भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट अक्षरशः फेकल्या.

अवश्य वाचा – न्यूझीलंड दौऱ्यातील अखेरच्या डावातही विराट सपशेल अपयशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 6:33 am

Web Title: ind vs nz mayank agarawal registered unwanted record in 2nd test psd 91
Next Stories
1 Ind vs NZ : कोणालाही दोष द्यायचा नाही; फलंदाजांच्या खराब कामगिरीवर बुमराहचं मत
2 Ind vs NZ : ‘त्या’ भन्नाट कॅचवर रविंद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
3 टीम इंडियावर व्हाईटवॉशची नामुष्की; न्यूझीलंड ७ गडी राखत विजयी
Just Now!
X