scorecardresearch

Premium

World Cup 2023: भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याची जबरदस्त क्रेझ, अवघ्या एका तासात विकली सर्व तिकिटं

India vs Pakistan Match Tickets: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याच्या तिकिटांची दुसरी खेप ३ सप्टेंबर रोजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघातील पहिला सामना १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

One Day World Cup 2023 Ind vs pak
बाबर आझम आणि रोहित शर्मा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

India vs Pakistan World Cup Match Tickets Sold Out in One Hour: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच एक वेगळीच उत्सुकता असते. या सामन्याची सर्व तिकिटे अवघ्या एका तासात विकली गेली.

यंदा विश्वचषक भारतात होत असल्याने प्रत्येक भारतीय चाहत्याला पाकिस्तानविरुद्ध स्टेडियममध्ये तिरंगा फडकवायचा आहे. कदाचित त्यामुळेच भारत-पाकिस्तान सामन्याबाबत चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या पहिल्या खेपेची तिकिटे तासाभरात विकली गेल्याने याचे वैशिष्ट्य दिसून आले.

ishan kishan & shreyas iyer
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून का वगळण्यात आलं?
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ
Shreyas Iyer Ishan Kishan
BCCI चा अय्यर-किशनला दणका, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं, पाहा रोहित, विराट, ऋतुराजला किती रुपये मिळणार?

बुक माय शो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या तिकीट भागीदाराने भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याच्या तिकिटांची दुसरी खेप ३ सप्टेंबर रोजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. ही तिकिटेही काही तासांतच विकली जाण्याची शक्यता आहे.भारताचे सामने आणि सराव सामन्यांसाठी किती तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवली गेली याची पुष्टी होऊ शकली नाही, परंतु असे कळते की विक्री २९ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता सुरू झाली आणि सर्व तिकिटे एका तासात विकली गेली.

हेही वाचा – Asia Cup 2023: चाहत्यांसाठी खूशखबर आशिया कपचे सर्व सामने तुम्ही पाहू शकता विनामूल्य; कधी, कुठे? जाणून घ्या

तिकिटांची विक्री केवळ मास्टरकार्डधारकांसाठी ठेवण्यात आली होती –

वृत्तसंस्था पीटीआयने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) संबंधित सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ‘भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे २९ ऑगस्ट रोजी केवळ मास्टरकार्ड असलेल्या चाहत्यांसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीला फक्त दोन तिकिटे खरेदी करता आली आणि भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे विक्री सुरू झाल्याच्या तासाभरात विकली गेली. तिकीट विक्रीची पुढील फेरी ३ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.’

हेही वाचा – आशिया चषक: माघार, बहिष्कार, रद्द, कधी वनडे कधी ट्वेन्टी२०-डगमगणारं वारु

बुक माय शोबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप –

दरम्यान, आयसीसीचा तिकीट भागीदार बुक माय शोच्या खराब सेवेबद्दल क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, तिकीट विक्री थेट सुरू झाल्याच्या काही मिनिटांतच, बुक माय शोची वेबसाइट क्रॅश झाली. यानंतरही चाहत्यांना आभासी रांगेत उभे असल्याचे दाखवण्यात आले. काही सेकंद गेले असतील की प्रतीक्षा वेळ वेगाने वाढला. बुक माय शो वेबसाइटने चाहत्यांना ६ तासांपेक्षा जास्त काळ संयमाने वाट पाहण्यास सांगितले, तर सर्व तिकिटे एका तासात विकली गेली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First batch of online tickets for ind vs pak world cup match were sold within an hour of the pre sale window vbm

First published on: 30-08-2023 at 13:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×