scorecardresearch

IND vs SL: एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा मजेशीर पद्धतीने जिममध्ये घाम गाळताना दिसला, पाहा व्हिडिओ

Rohit Sharma Gym video: भारत आणि श्रीलंका संघांत तीन सामन्याच्या वनडे मालिकेला मंगळवार पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी जिममध्ये रोहित शर्मा घाम गाळत आहे

IND vs SL: एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा मजेशीर पद्धतीने जिममध्ये घाम गाळताना दिसला, पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी एकदिवसीय मालिका (IND vs SL) १० जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. त्यासाठी त्याने मेहनत सुरू केली आहे. शुक्रवारी (६ जानेवारी), रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो मजेशीर पद्धतीने जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.

हिटमॅन नुकताच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यानंतर तो कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला. मात्र, रोहित आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. तसेच पुन्हा मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने जिममध्ये कठोर कसरत केली, ज्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वर्कआऊट करताना रोहित चांगलाच मूडमध्ये दिसत आहे.

रोहित शर्माने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना लिहले, ”जे करताना तुम्हाला हसू येते ते करा.”
रोहितने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर टिप्पणी करताना एका चाहत्याने लिहिले, क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन लोड करत आहे.

विशेष म्हणजे २०२२ मध्ये हिटमॅनच्या बॅटला इतक्या धावा मिळाल्या नाहीत. भारतीय कर्णधाराने गेल्या वर्षी एकूण ३९ सामने खेळले असून ४० डावांत २७.६३च्या सरासरीने ९९५ धावा केल्या आहेत. यामध्ये सहा अर्धशतकांचा समावेश होता.

हेही वाचा – India’s captaincy: कपिल देव यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, ‘तो कर्णधारपदासाठी …’

भारत आणि श्रीलंका संघांतील टी-२० मालिकेबद्दल बोलायचे, तर दोन्ही संघांत तिसरा आणि शेटवटचा सामना खेळाला जातोय. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. भारतीय पहिल्या ५ षटकांच्या समाप्तीनंतर १ बाद ३९ धावा केल्या. इशान किशन फक्त धाव करुन परतला. दरम्यान शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी खेळपट्टीवर खेळत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 19:46 IST

संबंधित बातम्या