IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. २० जूनपासून हेडिंग्लेमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या दौऱ्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान ही मालिका सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावाने खेळवली जाणार असल्याचं वृत्त बीबीसी स्पोर्ट्सने दिलं आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी रवाना होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेपूर्वी तेंडुलकर–अँडरसन ट्रॉफीचे अनावरण केले जाईल, असे या वृत्तात म्हटले गेले आहे. मात्र बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सचिन तेंडुलकर हा भारतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा, सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२९ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ७०४ गडी बाद केले आहेत.

जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर दोघेही क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. दोघे कसोटी क्रिकेटमध्ये १४ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान जेम्स अँडरसनने सचिनला ९ वेळेस बाद केलं आहे. सचिनला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस बाद करण्याचा रेकॉर्ड हा गौतम गंभीरच्या नावावर आहे.

असं आहे या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन

या दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव