आयपीएल २०२१ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात रंगतदार वळणावर आली आहे. स्पर्धेत आतापर्यंत प्लेऑफसाठी चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ पात्र ठरले आहेत. सनराइजर्स हैदराबाद या संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाइटराइडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स या संघांना प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यात अजूनही यश आलेलं नाही. बंगळुरूने एक सामना जिंकल्यास त्यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाइटराइडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स या चार संघांमध्ये चुरस असणार आहे. या चार संघांचे गुणतालिकेत प्रत्येकी १० गुण आहेत.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू– विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत मालिकेत ११ सामने खेळले आहेत. यातील ७ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावलं लागलं आहे. बंगळुरूचे अजूनही तीन सामने उरले आहेत. यापैकी एका सामन्यात विजय मिळाल्यास प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. बंगळुरूच्या खात्यात सध्या १४ गुण जमा आहेत. पंजाब, सनराइजर्स, हैदराबाद आणि दिल्ली यांच्यासोबत सामने आहेत.

— Punjab Kings (@PunjabKingsIPL)